ताज्या घडामोडीमहत्वाचेमहाराष्ट्र

१ हजार ९३५ गावांची पशुगणना पूर्ण तर ७८ गावात काम सुरू

पशुसंवर्धन विभाग : २७० गावांत प्रगणन करताहेत गणनेचे काम

 

अमरावती : जिल्ह्यात २५ नोव्हेंबर पासून सुरू झालेल्या २१व्या पशुगणनेत आतापर्यंत २ हजार २८३ गावांपैकी १९३६ गावांची पशुगणना पूर्ण झाली असून, ७८ गावे अपूर्ण आहेत. २७० गावांमध्ये प्रगणनेचे काम सुरू आहे. ही पशुगणना २८ फेब्रुवारीपर्यत पूर्ण करायची होती, मात्र पूर्ण न झाल्याने ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ दिली आहे.

जिल्ह्यात ५ लाख २५ हजार १५१ एवढ्या पशुधन व प्राण्यांची गणना झालेली आहे. पोल्ट्री फार्म १३ लाख ७४ हजार २१५ संख्या असून, त्यापैकी दहा लाख ४७ हजार ५०३ची गणना झाली आहे. पशुगणनेला मुदतवाढ मिळाल्यामुळे आता ७८ गावांमध्येच पशुगणनेचे काम बाकी असून २७० गावांमध्ये आजघडीला काम सुरू आहे. पशुगणनेचे काम गतीने करण्यासाठी पशुसंवर्धन विभागाकडून प्रयत्न केले जात आहेत. जिल्ह्यातील २ हजार १८ गावे आणि नागरी वाड्यांमधील एकूण २ हजार २८३ गावांपैकी १ हजार ९३६ गावांमध्ये पशुगणनेची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. सध्या २७० गावांमध्ये गणनेचे काम सुरू आहे. पशुगणनेसाठी ग्रामीण भागात १८० प्रगणक व ४८ निरीक्षक व शहरी भागात ५५ प्रगणक व १६ निरीक्षक, असे एकूण २९९ प्रगणक, पर्यवेक्षक प्रत्येक जनावराची आकडेवारी संकलित करीत आहेत.

२५ प्रश्नांची यादी पशुगणनेत २५ प्रश्नांची यादी आहे. ज्यामध्ये पशुपालकांच्या प्राथमिक माहितीशिवाय त्यांच्या शेतीची मालमत्ता, उत्पन्नाचे स्रोत, जातीनिहाय माहिती आणि त्यांचे पशुधन यांची माहिती संकलित केली जात आहे. यामध्ये कोणत्या गावात किती जनावरे आहेत.

पशुगणनेसाठी अॅप विकसित गणना अधिकारी घरोघरी जाऊन, गाय, म्हैस, बैल, मेंढी, शेळी, वराह, अशा १६ प्रजातींच्या प्राण्यांची माहिती संकलित केली जात आहे. सदर अॅप जीपीएस प्रणालीशी जोडलेले आहेत. यांच्या मदतीने नेटवर्क नसले तरी नेटवर्क झोनमध्ये गेल्यावर डेटा सेंट्रल सर्व्हरशी जोडला जाऊ शकतो.

भटक्या पशुची प्रथमच स्वतंत्र मोजणी
इतर जिल्ह्यांतून व राज्यांतून जिल्ह्यात येणाऱ्या भटक्या जातीतील उंट, घोडे, टट्ट, खेचर, गाढवे, हत्ती, अशा पशुधनाची प्रथमच स्वतंत्र मोजणी केली जात आहे. त्यामुळे जिल्हा पशुधन विभागाला भटक्यांची स्वतंत्र आकडेवारीही या पशुगणनेमुळे उपलब्ध होणार असल्याने नेमकी आकडेवारी समजू शकणार आहे.

३१ मार्च पर्यत डेडलाईन पशुगणनेचे कामकाज गत २५ नोव्हेबर पासून सुरू झालेले होते. यासाठी २८ फेब्रुवारी ही अंतिम मुदत देण्यात आली होती. त्यानंतर पशुगणनेच्या कामाला आता ३१ मार्चपर्यंत मुदत देण्यात आलेली आहे. त्यामुळे दिलेल्या मुदत वाढीच्या कालावधीत पशुगणनेचे १०० टक्के काम पूर्ण करण्याचे आवाहन प्रगणक व पर्यवेक्षक यांच्या समोर उभे ठाकले आहे.

शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: या पोर्टल वरील बातम्या,लेख,फोटो,विडियो कॉपी करू नये.