ताज्या घडामोडीमहत्वाचेमहाराष्ट्र

तलईतील शासकीय जागेवरील अतिक्रमण हटविले

४८ लोकांनी केले होते दोन महिन्यांपासून अतिक्रमण

 

 

 

धारणी : शहराला लागून असलेल्या मौजे तलई येथे शासकीय जागेवरील अतिक्रमण बुधवारी हटविण्यात आले. मागील दोन महिन्यांपासून हे अतिक्रमण

काय असल्याने नगरपंचायत प्रशासनासाठी ते डोकेदुखी ठरले होते. शहरातील सर्व्हे नंबर १३१ व १३२ मध्ये सुमारे ४८ लोकांनी मागील दोन महिन्यांपासून अनधिकृतरीत्या अतिक्रमण केले होते. त्यांना अतिक्रमण निष्कासन करण्याबाबतची नोटीस तहसीलदारांनी देऊनसुद्धा त्यांनी अतिक्रमण न हटविल्यामुळे ५ मार्च रोजी

सहायक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी प्रियंवदा महाडदळकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि तहसीलदार प्रदीप शेवाळे व नायब तहसीलदार राजेश माळी यांच्या पथकाकडून पुरेशा पोलिस बंदोबस्तामध्ये ते अतिक्रमण हटविण्यात आले. यावेळी कोणीही विरोध न केल्याने कारवाई शांततेत पार पडली.

शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: या पोर्टल वरील बातम्या,लेख,फोटो,विडियो कॉपी करू नये.