Kalyan : कल्याण जागतिक महिला दिनानिमित्त कॅन्सरच्या जनजागृतीसाठी कल्याणात महिलांचा “साडी वॉकेथॉन”

कल्याण :- देशभरात महिलांमध्ये ब्रेस्ट(breast आणि गर्भाशयाच्या कॅन्सरचे प्रमाण वाढत असून, त्याबाबत जनजागृती करण्यासाठी जागतिक महिला दिनानिमित्त कल्याणात ‘साडी वॉकेथॉन’ उपक्रम राबविण्यात आला. कल्याण रेडिओलॉजिस्ट असोसिएशन आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबवण्यात आला.
स्व. यशवंतराव चव्हाण क्रीडांगण येथून या साडी वॉकेथॉनला प्रारंभ
कल्याण पश्चिमेतील स्व. यशवंतराव चव्हाण क्रीडांगण येथून या साडी वॉकेथॉनला प्रारंभ करण्यात आला. ज्यामध्ये कल्याण शहरातील डॉक्टर, उद्योजक, नोकरदार, गृहिणी अशा सर्वच गटातील महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. या सर्व महिलांनी भारतातील महिलांचा पारंपरिक वेश म्हणून समजला जाणारा जाणाऱ्या साडी नेसून या उपक्रमात भाग घेत ब्रेस्ट आणि गर्भाशयाच्या कॅन्सरबाबत जनजागृतीचा संदेश दिला. ज्यामध्ये केडीएमसीच्या आयुक्त डॉ. इंदू राणी जाखड, कल्याण आयएमए अध्यक्ष डॉ. सुरेखा ईटकर, डॉ. सारिका दुबे, डॉ. किरण शिंदे, डॉ. सोनाली पाटील या आघाडीच्या महिलांनी यामध्ये पुढाकार घेतल्याचे दिसून आले.