१२५ ग्रापंमध्ये मतदार यादीचा कार्यक्रम

अमरावती : जिल्ह्यात ४ ग्रामपंचायतीची मुदत संपत असल्याने सार्वत्रिक निवडणूक व १२५ ग्रापंमध्ये रिक्त पदांमुळे पोटनिवडणूक होणार आहे. यासाठी राज्य निवडणूक आयोगाद्वारा मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आलेला आहे. शिवाय चिखलदरा तालुक्यातील रुईपठार ग्रामपंचायतमध्ये बुधवारी प्रारुप प्रभागरचना प्रसिद्ध करण्यात आली. यावर १९ पर्यत आक्षेप मागविण्यात आले आहे.
राजीनामा, निधन अर्नहता, व इतर कारणांमूळे जिल्ह्यातील १२५ ग्रामपंचायतीमध्ये १८९ सदस्यपदे रिक्त आहेत. याशिवाय ६ थेट सरपंचपदे रिक्त आहेत. यामध्ये ३५ पदे अनु जाती, ८१ अनु, जमाती व ११ पदे नामाप्र साठी राखीव आहेत.
यामध्ये ५९ पदे सर्वसाधारण प्रवर्गात आहेत. याशिवाय थेट सरपंचपदांमध्ये १ अनु, जाती, ३ अनुय. जमाती व १ नामाप्रसाठी असल्याचे जिल्हा प्रशासनाने सांगितले. खेलदेवमाळी ग्रामपंचायतमध्ये ११, शहापूर ११, वरुड १७ व रुईपठार ग्रामपंचायतमध्ये ७ सदस्य पदे आहेत. याशिवाय प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये प्रत्येकी एक थेट सरपंच राहील. त्या आगामी निवडणुकांकडे गावपुढाऱ्यांचे लक्ष लागले आहे. समिरकणांची जुळवाजुळवदेखील सुरू करण्यात आली आहे.
या सर्व ग्रामपंचायतींमध्ये १९ मार्चला प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध होईल. त्यावर २४ मार्चपर्यंत हरकती दाखल करता येतील व प्रभागनिहाय अंतिम मतदार यादी २६ मार्चला प्रसिद्ध होणार आहे.