महाड सत्याग्रह” हा “बहुजनांचा क्रांती दिवस” – प्रदीप गायकवाड
अंजनगाव सुर्जी येथे समता सैनिक दल कार्यकर्ता प्रशिक्षण मेळाव्याचे आयोजन

अंजनगाव सुर्जी :
अंजनगाव सुर्जी येथे समता सैनिक दला तर्फे महाड चवदार तळे सत्याग्रह दिन व समता सैनिक दल स्थापना दिनानिमित्त एकदिवसीय कार्यकर्ता प्रशिक्षण मेळाव्याचे आयोजन दि. २० मार्च २०२५ रोजी भीमनगर सुर्जी येथे करण्यात आले होते.
यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून समता सैनिक दलाचे राष्ट्रीय संघटक प्रदीप गायकवाड होते तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. संजय अभ्यंकर, व प्रमुख उपस्थिती म्हणून प्रा. अस्मिताताई अभ्यंकर, रमेश सावळे, वानखडे,डॉ अंबाळकर, अनिल खलोकार हे प्रामुख्याने मंचावर उपस्थित होते.
यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रदीप गायकवाड म्हणाले की, महाडचा चवदार तळ्याचा पाण्याचा सत्याग्रह व समता सैनिक दलाची स्थापना दिन तसेच २५ डिसेंबर १९२७ मनुस्मृतीचे दहन करुन एक नवीन क्रांती डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी घडवली. महाड हे शहर “बहुजन क्रांती” स्थळ बनले आहे. अस्पृश्य घटकांना महाड येथे समता प्रस्थापित केली आहे. महाडचा चवदार तळ्याच्या सत्याग्रह केवळ पाण्यासाठी नसून तो मानवी मुलभूत हक्कांचा लढा होता असे प्रखर मत प्रमुख मार्गदर्शक प्रदीप गायकवाड यांनी सांगितले.
या कार्यकर्ता प्रशिक्षण मेळाव्याचे अध्यक्ष प्रा संजय अभ्यंकर यांनी सांगितले की, संविधानानुसार प्रत्येक माणसाला मुलभूत अधिकार दिले परंतु ख-या अर्थाने ७५ वर्षाच्या कालावधीत बहुजन समाजाला न्याय मिळाला नाही. बजेट मध्ये बहुजन समाजाला त्यांच्या संख्येनुसार वाटा मिळाला पाहिजे. परंतु अजून पर्यंत वाटा मिळाला नाही,ही फार मोठी खंत आहे. असे मत अभ्यंकर यांनी व्यक्त केले. प्रा. अस्मिता अभ्यंकर यांनी सांगितले की, कोणतेही चळवळ ही महिलां शिवाय मोठी होवून शकत नाही. प्रत्येक महापुरुषांच्या पाठीशी एक महिला खंबीर पणे उभ्या राहिलेल्याने चळवळ गतीमान झाली आहे. असे मत अस्मिता अभ्यंकर यांनी व्यक्त केले.
या कार्यकर्ता प्रशिक्षण मेळाव्याचे आयोजन समता सैनिक दलाचे अमरावती जिल्हा संघटक सिध्दार्थ सावळे, रमेश सावळे, तेजस अभ्यंकर, नंदाताई आठवले,जितेंद्र इंगळे, राजेश चोरपगार, यांनी केले तर हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बाबाराव खोब्रागडे, तेजस अभ्यंकर, सुनील राक्षसकर,सोमेश इंगळे, बाळा आठवले, विलास सरदार,लक्ष्मण मोहोळ, भारत वर्धे ,चंदाताई दांडगे,वंदनाताई वानखडे,सरिताताई जामनिक, रेखा इंगळे,चंदाताई इंगळे,सिमा लबडे,रुपालीताई वानखडे,सह मेळाव्यात डोबाळा,रामापूर, असदपूर, काकडा,शामपूर, वडाली,पांढरी, अडगाव खाडे, विहिगाव, बोराळा, हंतोडा,सातेगाव,लखाड ,पनोरा ,शिंगणापुर,हतापूर,खिराळा,भीमनगर, आंबेडकर नगर, दहिगाव येथील समता सैनिक दल या मेळाव्यात सहभागी झाले होते.कार्यक्रमाला महापुरुषांना मानवंदना देवून व महापुरुषांच्या पुतळ्याला माला अर्पण करून कार्यक्रमाला सुरवात करण्यात आली.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक रमेश सावळे यांनी केले तर सूत्रसंचालन सिध्दार्थ सावळे यांनी केले व आभार सुनील डोंगरदिवे यांनी केले.