महसूलचे मौन; पोलिसांकडून कारवाई

अमरावती : गौण खनिजाचे उत्खनन व अवैध वाहतुकीवर कारवाई करण्याची महसूल विभागाची जबाबदारी असताना अचलपूर उपविभागात वाळू तस्कर सुसाट सुटल्याचे चित्र आहे.
‘महसूल’च्या नाकावर टिच्चून वाळू तस्करी होत असल्याचे लक्षात येताच सहायक पोलिस अधीक्षक डॉ. शुभम कुमार यांच्या नेतृत्वात अचलपूर उपविभागात २९ मार्च रोजी वाळू तस्करांवर कारवाई करण्यात आली. त्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा नोंदवून त्यांच्याकडून वाळू व ट्रक असा ९८.९० लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
तीन वेगवेगळी पथके तयार करून नाकाबंदी केली. त्या अंतर्गत अचलपूर ठाण्याच्या हद्दीत सय्यद आसीफ सय्यद मुसा (४५) व शेख इरशाद शेख इकबाल (२५, दोघेही रा. वरूड) यांना ट्रक क्रमांक एमएच ४० सीएम ३४९८ मधून विनापरवाना ४८ टन वाळूची वाहतूक करताना पकडण्यात आले. त्यांच्याकडून वाळू व ट्रक असा ३२ लाख ९० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्याचप्रमाणे परतवाडा ठाण्याच्या हद्दीत इमरान खान रहेमत खान (३१) रा. शेंदूरजनाघाट याला ट्रक क्रमांक एमएच २७ डीटी १०१३ मधून विनापरवाना आठ ब्रास वाळूची आले वाहतूक करताना पकडण्यात आले.
अचलपूर उपविभागात धडक कारवाई; वाळू, ट्रकसह १ कोटींचा मुद्देमाल जप्त, पाच आरोपीविरुद्ध गुन्हा त्याच्या विरुद्ध गुन्हा नोंदवून वाळू व ट्रक असा ३१.५० लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सरमसपुरा ठाण्याच्या हद्दीतून ट्रक क्रमांक एमएच २७ बीएक्स ४३४४ मधून विनापरवाना ७२ टन वाळूची वाहतूक करताना राजेश धुळे (३९, रा. हनवतखेडा) व नितेश चौधरी (३३, रा. पाळा, मोर्शी) यांना पकडण्यात आले. त्यांच्याकडून वाळू व ट्रक असा ३४ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
वाळू तस्करी रोखण्याचे आदेश पोलिस अधीक्षक विशाल आनंद यांच्या मार्गदर्शनात ही कारवाई पोलिस उपनिरीक्षक सुभाष मिश्रा, सहायक पोलिस उपनिरीक्षक सिद्धार्थ वानखडे, बिहारीलाल जावरकर, रवींद्र मोरे, विराज ठाकूर, राज अहिरवार, मंगेश पाटील, आशिष वरघट, नीलेश वानखडे, नरेश कलाने, संजय गेठे, नीलेश मेहरे यांच्या पथकाने केली.