कृषीताज्या घडामोडीदेश विदेशमहत्वाचेमहाराष्ट्र

खरिपातील बाधित पिकांसाठी ७८ कोटींचे शासन अनुदान

ऑगस्ट ते ऑक्टोबर २०२४ मधील अतिवृष्टी, पुरामुळे पिकांचे नुकसान

अमरावती : गतवर्षी ऑगस्ट ते ऑक्टोबर या कालावधीत पाऊस व पुरामुळे ६५०६२ शेतकऱ्यांच्या ५५२१५ हेक्टरमधील पिकांचे नुकसान झाले होते. यासाठी ७७.७५ कोटींचा शासननिधी उपलब्ध झाला आहे. ई-केवायसी केलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात हा निधी जमा करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.

गतवर्षी सरासरीपेक्षा जास्त पावसाने खरीप पिकांसह बागायती पिकांचे मोठे नुकसान झाले होते. यामध्ये एनडीआरएफ’ निकषानुसार शासन मदतीची मागणी करण्यात आली होती. बाधित शेतकऱ्यांच्या याद्या तयार आहेत. या शेतकऱ्यांनी ई-केवायसी केल्यानंतर शासन निधी त्यांच्या खात्यात जमा होण्याची प्रक्रिया सुरु झालेली आहे. शासन अनुदान उपलब्ध झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

 

ऑगस्ट महिन्यातील नुकसानीसाठी मंजूर निधी

1)धारणी——— २३.६९ कोटी

2)दर्यापूर———१८.१५ कोटी

3)मोर्शी——-९.५८ कोटी

4)अचलपूर——२.६६ कोटी

5)चिखलदरा —–१.९१ कोटी

एकूण——-६५.३४ कोटी

 

८.८० भातकुली तालुक्यात सप्टेबर महिन्यात पाऊस व अतिवृष्टीमुळे नदी-नाल्यांना पूर आला होता व पुरामुळे काठालगतची ४८.९१ हेक्टर आर जमीन खरडली गेली.

लाख रुपये पुराने खरडून गेल्याचे अनुदान

शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: या पोर्टल वरील बातम्या,लेख,फोटो,विडियो कॉपी करू नये.