ताज्या घडामोडीमहत्वाचेमहाराष्ट्र

Kolar Daru Raid: कोलार येथे गावठी दारूवर छापा; डीबी पथकाची कारवाई

मानोरा : तालुक्यातील गिरोली बिट हद्दीत पोलिसांचा ताफा पेट्रोलींग करीत असतांना मिळालेल्या गुप्त बातमीवरून ग्राम कोलार येथील पांडुरंग भगवान सावळे यांच्या घराची पोलिसांनी झडती घेतली असता गावठी हात भट्टी दारूवर धाड  टाकून २६,००० रुपयाचा मुद्देमाल जप्त करून नष्ट केला.

पोलीस सूत्राकडून प्राप्त माहितीनुसार, पोलिसांनी पांडुरंग सावळे यांच्या घराची झडती घेतली १० लिटर हात भट्टीची दारू किंमत १००० रुपये व २०० लीटर सडवा मोहमाच किंमत २०, ००० रुपये व दारू गाळण्याचे साहित्य किंमत ५,००० असा एकूण २६,००० रुपयाचा दारूसह मुद्देमाल जप्त केला. अवैद्यरित्या गावठी दारू सह  मुद्देमाल मिळून आल्याने तो पंचा समक्ष पोलिसांनी जप्त करून वरील आरोपी विरुध्द महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम ६५ (ई) (फ) अन्वये गुन्हा दाखल केला.

सदर कारवाई  पोलीस निरीक्षक प्रविण शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली डि बी पथकाचे पोलीस उपनिरिक्षक अभिजीत बारे, पोहवा मदन पुणेवार , पोलीस कर्मचारी मनीष अगलदरे, चालक पोलीस शिपाई श्रावण राठोड यांनी केली.

शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: या पोर्टल वरील बातम्या,लेख,फोटो,विडियो कॉपी करू नये.