Illegal sand Crime: औंढा नागनाथ तालुक्यात दुसऱ्या दिवशीही अवैध वाळू साठा जप्त
औंढा नागनाथ तहसीलदार हरीश गाडे यांच्या पथकाची

औंढा नागनाथ : अवैध वाळू साठ्यावर औंढा नागनाथ तहसीलदार हरीश गाडे यांच्या पथकाने 26 मार्च बुधवार रोजी सकाळी साडेअकरा वाजे दरम्यान सलग दुसऱ्या दिवशीही कारवाई करून अनखळी शिवारात वाळूमाफीयांनी अवैध साठा करून ठेवलेला 50 ब्रास वाळूचा साठा जप्त करून औंढा नागनाथ तहसील कार्यालय येथे सायंकाळी 5 वाजे दरम्यान वाहनाद्वारे आणून जमा करण्यात आला आहे.
पथकामध्ये तहसीलदार हरीश गाडे, मंडळ अधिकारी पी. आर. काळे, तलाठी विठ्ठल शेळके गजानन हजारे, सचिन जोंधळे, सुवर्णमाला शिरसाट, माधव भुसावळे, एन.डी गोडसे, वर्षा टेंभुर्णे, एन. एल मुंडे, एन बी आंबोरे डी.पी बांगर दीपक जाधव , के. एल. जगताप, किसन फलटणकर, सविता भिसे, जुही घोडे, गणेश माहुरे, किसन जाधव, चालक भगवान कदम यांचा महसूल पथकामध्ये समावेश होता, कारवाई केल्याची माहिती पथकाने दिली सतत दोन दिवस कारवाई झाल्याने वाळू माफिया चे धाबे दणाणले आहे.