ताज्या घडामोडीमहाराष्ट्र
भातकुलीत वृक्षांची कत्तल

वाठोडा शुक्लेश्वर : भातकुली तालुक्यात दिवसाढवळ्या हिरव्या झाडांची कत्तल मोठ्या प्रमाणात होत आहे. यामध्ये कडुनिंब, वड, पिंपळ, बाभूळ, आंबा, चिंच आदी वृक्षांचा समावेश आहे. एकीकडे रुंदीकरणासाठी रस्त्यालगत असणाऱ्या मोठमोठ्या वृक्षांची कत्तल होत आहे, तर दुसरीकडे शेताचे धुरे पेटून पद्धतशीरपणे वृक्षांची कत्तल सुरू आहे. वनविभागाच्या वरिष्ठांनी याला आळा घालावा, अशी मागणी वृक्षप्रेमी करीत आहेत.