Tivasa police: तिवसा येथील एटीएम फोडणारे 2 आरोपी पोलिसांच्या तावडीत

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
तिवसा : येथील भारतीय स्टेट बँकेचे एटीएम फोडून 4 लाख 80 हजार रुपये पळवून नेणाऱ्या 2 आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने हरियाणा राज्यातून अटक केले. त्यांच्याकडून घटनेत वापरण्यात येणारी वरणा कार सह मोबाईल असा एकूण 8 लाख 10 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आरोपीना न्यायालयाने 20 मार्च पर्यत पीसीआर मंजूर केला आहे.
आरोपींना हरियाणा राज्यातून अटक
आमीरखान अख्तर खान (वय 35) रा. मोहमदपूर अहिर, जि. नुह (हरियाणा) व जुबेर अल्लाहदिया (वय 32), रा. धौज, जि. फरीदाबाद (हरियाणा) असे एटीएम फोडीत अटक करण्यात आलेल्या 2 आरोपींची नावे आहेत. 26 फेब्रुवारी रोजी तिवसा येथील स्टेट बँकेचे एटीएम गॅस कटरच्या साहायाने त्यांनी फोडले होते व त्यातील 4 लाख 80 हजार रुपये लंपास केले होते. मात्र हे एटीएम फोडत असतांना गॅस कटरच्या ठिणगीने एटीएम मशीन सह रूम जळाली होती. याप्रकरणी अल्पेश तांबूसकर यांनी तिवसा पोलीसात तक्रार दाखल केली असता पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध कलम 331(4),305 अन्वये गुन्हा दाखल केला होता.
सदर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी एटीएम फोडणार्या टोळीला पकडण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखा अमरावती ग्रामीण येथील पोलीस अधिकारी व अंमलदार यांना मार्गदर्शन करून व वेगवेगळे पथक तयार करून सूचना निर्गमित केल्या होत्या. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेने उपलब्ध सीसीटीव्ही फुटेजच्या विश्लेषणावरून व मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे सदर गुन्हा हा हरियाणा राज्यातील कुख्यात टोळीने तिवसा येथे येऊन केला असल्याचे समजले.
त्यावरून सदर पथकाने 13 मार्च रोजी हरियाणा येथील मोहमदपूर अहिर येथे सापळा रचून गुन्ह्यातील आरोपी आमिर खान अख्तर यास ताब्यात घेतले व त्यास गुन्ह्याबाबत विचारपूस केली असता, त्याने आधी उडवाउडवीचे उत्तरे दिली व पुन्हा त्यास विश्वासात घेऊन अधिक विचारपूस केली असता त्याने सदर गुन्हा त्याचे साथीदारांसह मारुती सुझुकी स्विफ्ट व वरणा कार ने केली असल्याची कबुली दिली.
आरोपी आमीर खान अख्तर याचे सांगणे वरून त्याने धौज येथील राहणारा जुबेर याचे मारुती स्विफ्ट गाडीने साथीदारांसह तिवसा येथे जाऊन गुन्हा केला असल्याची कबुली दिल्यावरून धौज येथे पोलिसांनी सापळा रचून गुन्ह्यातील दुसरा आरोपी जुबेर अल्लाहदिया याला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याची चारचाकी वापरून त्याचे साथीदारांनी सदर एटीएम फोडून रक्कम चोरी केली असल्याची कबुली दिली. त्यास देखील 17 मार्च रोजी अटक करण्यात आली.
आरोपीस पुढील कारवाई करिता गुन्ह्यातील जप्त विना क्रमांकाची एक हुंडाई कंपनीची वरणा कार किंमत 8 लाख व एक मोबाईल किंमत 10 हजार असा एकूण 8 लाख 10 हजाराचा मुद्देमाल तिवसा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला असून, पुढील तपास तिवसा पोलीस करीत आहे. दोन्ही अटक आरोपींना न्यायालयाने 20 मार्च पर्यत पीसीआर मंजूर पोलीस अधीक्षक विशाल आनंद ,अप्पर पोलीस अधिक्षक पंकज कुमावत यांचे आदेशाने स्थानिक गुन्हे शाखा अमरावती ग्रामीणचे पोलीस निरीक्षक किरण वानखडे यांचे मार्गदर्शनाखाली पो. उप. निरीक्षक सागर हटवार, पो उप नि.मोहम्मद तसलीम, पो उप नि. मूलचंद भांबुरकर, पोलीस अंमलदार अमोल देशमुख, बळवंत दाभने, रवींद्र बावणे, गजेंद्र ठाकरे, भूषण पेठे, मंगेश लकडे, सचिन मसांगे, पंकज फाटे, दिनेश कनोजिया, संजय प्रधान, सुरेश पवार, सागर धापड, चेतन गुल्हाने, शिवा सिरसाट यांनी केली आहे.