राज्यस्तरीय विवेकानंद युवा पुरस्काराने ललित ढेपे सन्मानित

प्रतिनिधी श्रीकांत नाथे
अंजनगाव सुर्जी : येथील युवा सामाजिक कार्यकर्ते तथा कर्मयोगी फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष ललित ढेपे यांना तरुणाई फाउंडेशन व शुभम साहित्य मंडळ यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित साहित्य संमेलन कार्यक्रमात शाल, श्रीफळ तथा सन्मान चिन्ह देऊन राज्यस्तरीय स्वामी विवेकानंद युवाश्री पुरस्कार २०२५ ने सन्मानित करण्यात आले. तरुणाई फाउंडेशनच्या वतीने हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
यावेळी संमेलनाध्यक्ष ज्येष्ठ वऱ्हाडी साहित्यिक शिवलिंग काटेकर, स्वागताध्यक्ष संचालक शेतकरी वाडा विठ्ठल माळी, बालकलाकार अथर्व मोटे तसेच विशेष अतिथी म्हणून डॉ. तुषार बैसाणे, संदीप पाटील लोड, डॉ. संतोष हुशे, संजय देशमुख प्रा. दिपाली सोसे तथा तरुणाई फाउंडेशन चे संस्थापक संदीप देशमुख उपस्थित होते.
ललित ढेपे कर्मयोगी फाउंडेशनच्या वतीने श्री. संत गाडगेबाबा यांचे विचार जनमानसात पोहचविण्याचे कार्य करीत आहेत. सोबत ऋणानुबंध या परिचय पुस्तकाच्या माध्यमातून उपवर युवक -युवतींचा परिचय मेळावा राबवीत आहे. याचबरोबर अंधश्रद्धा निर्मूलन,रक्तदान, शैक्षणिक, पर्यावरण संवर्धन या विषयात सुद्धा जनजागृतीचे कार्य करीत आहेत. ललित ढेपे यांना राज्यस्तरीय स्वामी विवेकानंद युवाश्री पुरस्कार मिळाल्याबद्दल सामाजिक स्तरावरून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.