कृषी उत्पन्न बाजार समिती आणि लोकजागर संघटनेच्या समन्वये “मधुलीला पाणपोई” चे उद्घाटन

प्रतिनिधी श्रीकांत नाथे
कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आठवड्याच्या प्रत्येक सोमवारी गुरांचा बाजार भरतो. परंतु त्याठिकाणी पशुधनाला पिण्याच्या पाण्याचा हौद उपलब्ध नव्हता. त्यामुळे त्याची गैरसोय पाहता व उन्हाचा पारा वाढत असल्याने त्या गुरांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध व्हावे यासाठी लोकजागर संघटन आणि कृषी उत्पन्न बाजार समितीच्या समन्वये “मधुलीला पाणपोई” उभारण्यात आली. “मधुलीला पाणपोई” च्या उद्घाटन प्रसंगी पर्यावरण आणि जीवसृष्टीच्या अस्तित्वाचा तसेच कल्याणाच्या उद्दात हेतूने प्रेरित होऊन हा उपक्रम राबविल्याचे लोकजागर संघटन आणि कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मान्यवरांनी यावेळी म्हटले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक सौ.अनिता गोल्डे यांनी केले. पशुधन सुद्धा या सृष्टीचा सजीव घटक आहेत आणि त्यांना तहान भूक लागते. आठवड्यातील सोमवारी गुरांची होणारी ही गैरसोय त्यांची दयनीय अवस्था बघवत नसल्याने स्व.लीलाबाई मधुकरराव धारस्कर यांच्या स्मरणार्थ आम्ही हा पशु पक्ष्यांकरिता “मधूलीला पाणपोई” उभारल्याचे संजय धारस्कर यांनी म्हटले.
कृषी उत्पन्न बाजार समितीचे पदाधिकारी व लोकजागर संघटनेचे पदाधिकारी याप्रसंगी उपस्थित होते. आनंद दादा संगई, देवानंद महल्ले,शरद कान्हेरकर, प्रशांत गोतमारे, नानाभाऊ शिंदीजामेकर, राजेन्द्र हजारे, राजेन्द्र मंडवे, दिपक पिंगे, ओमप्रकाश कबाडे, संतोष गोलाईत, नितीन आवंडकर आणि योग पतंजली परिवाराच्या सौ.संगिता मेन, सौ.अनिता सोनपरोते, सौ.दिपाली मेन, सौ.धरमठोक, सौ.सुने, सौ.घोगरे तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष जयंत साबळे, संचालक विकास येवले, सदस्य शंकरराव चोरे, अनंत रोकडे, संजय ढोक, अमोल पोटे ,सर्व कर्मचारी वर्ग तसेच शहरातील प्रतिष्ठित नागरिक सुरेश काळमेघ, पत्रकार गजानन चांदूरकर ,पत्रकार श्रीकांत नाथे उपस्थित होते.सदर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सौ.सारिका धामोडे यांनी केले.