TamilNadu Accident: सरकारी बस-लॉरीमध्ये भीषण टक्कर, 5 प्रवाशांचा मृत्यू…

अपघातात 10 जणांची प्रकृती गंभीर
तिरुत्तानी : तामिळनाडूमधून एका दुःखद रस्ते अपघाताची बातमी समोर आली आहे. येथे एका सरकारी बस आणि टिप्पर लॉरीमध्ये भीषण टक्कर झाली. या अपघातात बसमधील पाच प्रवाशांचा मृत्यू झाला. त्याच वेळी, 10 प्रवासी गंभीर जखमी झाले. सर्व जखमींना तिरुत्तानी जनरल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.
केजी कांदिगाई परिसरातील थिरुत्तानीजवळ आज हा अपघात झाला. तिरुत्तानी पोलिसांनी माहिती देताना सांगितले की, प्रवाशांनी भरलेली एक सरकारी बस मागून येणाऱ्या टिप्पर लॉरीला धडकली. या अपघातानंतर बसमध्ये आरडाओरडा सुरू झाल.
#WATCH | Tamil Nadu | Visuals from the KG Kandigai area where 5 people lost their lives in a Tipper Lorry, and Bus collision near Thiruttani. As per Tiruttani Police, 10 others are in critical condition and admitted to Thiruttani General Hospital pic.twitter.com/cfLFlDwItJ
— ANI (@ANI) March 7, 2025
समोर आलेल्या अपघाताच्या व्हिडिओमध्ये बसचा पुढचा भाग खराब झाला आहे आणि काच फुटल्याचे स्पष्टपणे दिसून येते. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि सर्व जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. त्याच वेळी, पाचही मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले.
तिरुत्तानी पोलिसांनी सांगितले की, या अपघातात 5 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, इतर 10 प्रवाशांची प्रकृती गंभीर असून, त्यांना तिरुत्तानी जनरल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. अपघाताचा एक व्हिडिओ समोर आला आहेm ज्यामध्ये बस मागून लॉरीला धडकताना दिसत आहे. लॉरीला धडकलेली बस जेसीबीने बाहेर काढली. अपघातानंतर घटनास्थळी लोकांची मोठी गर्दी जमली.