Hingoli Zilla Parishad: हिंगोलीत अंगणवाडी पर्यवेक्षीका, सेविका, मदतनीसांचा गौरव

हिंगोली : महिला व बाल कल्याण विभाग जिल्हा परिषदच्या वतीने पुरस्कार सोहळा षटकोणी सभागृहात 7 मार्च रोजी आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्या हस्ते करण्यात आले. तर प्रमुख पाहुने म्हणून जिल्हा परिषदच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार, प्रकल्प संचालक नामदेव केंद्रे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनंतकुमार कुंभार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी गणेश वाघ, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शेळके, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण अधिकारी यादव गायकवाड समाज कल्याण अधिकारी राजू ऐडके, आदींची प्रमुख उपस्थीती होती.
राष्ट्रीय पोषण माह. सप्टेंबर २०२४ व पोषण ट्रॅकर ॲपवरील नोंदीमध्ये उल्लेखनीय काम केल्याबदल अंगणवाडी पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका, व मदतीस यांचा जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्या हस्ते सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले.