अवैध दारू विक्रीकरिता घेऊन जाणारे तीन जण अंजनगाव पोलिसांच्या जाळ्यात
आरोपींवर महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये कारवाही

अंजनगाव सुर्जी : होळी आणि रमजानच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक विशाल आनंद सिंगुरी यांच्या मार्गदर्शनात अंजनगाव सुर्जी पोलिसांनी मोठी कारवाही केली आहे.अंजनगाव सुर्जी पोलीस स्टेशन हद्दीतील पांढरी ते शहानूर रोडवरील कॅनल जवळ अवैध दारू विक्री करिता घेऊन जाणाऱ्या दोन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून जवळपास सव्वा लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे.
माहितीसूत्रानुसार पांढरी ते शहानूर रोडवरील कॅनल जवळ आरोपी प्रीतम गोपालराव आवंडकर,आरोपी देवा गजानन गवई हे दोघे राहणार अंजनगाव आणि खोडगाव येथील आरोपी किशोर रवींद्र येवूल हे त्यांच्या होंडा कंपनीच्या एक्टिवा गाडी क्रमांक MH 27 DN 5502 वरून अवैध दारू विक्री करिता घेऊन जात असता 12 मार्च 2025 रोजी सात ते आठ वाजताच्या सुमारास पोलिसांना मिळालेल्या गुप्तमाहितीवरून अंजनगाव पोलिसांनी आरोपी व दुचाकी सह अवैध दारू असे एकूण एक लक्ष बारा हजार चारशे (1,12,400) रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.ज्यामधे ऑफिसर चॉईस कंपनीच्या 96 पावट्या 180 एम एल ज्याची किंमत 14,400 रुपये, टॅंगो पंच कंपनीच्या देशी दारू 300 पावट्या 90 एम एल च्या ज्याची किंमत 15,000 रुपये आणि हायवर्ड 5000 कंपनीची बियर 12 नग ज्याची किंमत 3,000 रुपये तसेच होंडा कंपनीची एक्टिवा ज्याची किंमत ऐंशी हजार (80,000) रुपये असा एकूण एक लाख बारा हजार चारशे (1,12,400) रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
सदरची कारवाही पोलीस अधीक्षक विशाल आनंद सिंगूरी, अप्पर पोलीस अधीक्षक पंकज कुमावत,उपविभागीय पोलीस अधिकारी सिद्धेश्वर धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली अंजनगाव सुर्जी चे परि.सहा.पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे (ठाणेदार) यांच्या नेतृत्वाखाली पोहेकॉ श्याम राऊत, पोकॉ प्रमोद अरबट, प्रमोद चव्हाण, अमित घाटे, आकाश रंगारी, सागर दुतोंडे, आदित्य ठाकूर यांनी महाराष्ट्र दारूबंदी कायदा 134/2025 कलम 65 (a) (e) अन्वये कारवाही करून आरोपींना ताब्यात घेतले.