Nagpur Violence: Breaking News: नागपूरात दंगल उसळल्यानंतर आज संचारबंदीत सूट…

‘या’ हद्दीत संचारबंदी पुर्णतः शिथील
नागपूर : नागपूर हिंसाचारानंतर पोलिस अॅक्शन मोडवर होते. दंगल उसळल्यानंतर नागपूर पोलिसांकडून शहरातील ११ पोलीस ठाण्याच्या हद्दीत कर्फ्यु लावण्यात आला होता. आता तीन दिवसानंतर आज काही पोलिस ठाणे हद्दीत संचारबंदीत 2 तासांची सूट देण्यात आली आहे.
नागपूर शहरातील कोतवाली, गणेशपेठ, तहसील, लकडगंज, पाचपावली, शांतीनगर, सककरदरा, नंदनवन, इमामवाडा, यशोधरानगर, कपीलनगर, या परिसरात संचारबंदी लागू करण्यात आली होती. आता पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार आज नंदनवन, कपीलनगर या ठिकाणची संचारबंदी पुर्णतः उठविण्यात आली आहे.
शहरातील लोकांना दैनंदिन जीवनावश्यक वस्तु प्राप्त करता याव्यात व जनजीवन सुरळीत राहावे. याकरिता लकडगंज, पाचपावली, शांतीनगर, सक्करदरा आज दुपारी १४.०० ते १६.०० या कालावधी करीता शिथील करण्यात आली आहे. सायंकाळी १६.०१ वा. पासुन पुढे सदरहु संचारबंदी पुर्ववत अंमलात राहील.
तसेच कोतवाली, तहसील व गणेशपेठ येथील संचारबंदी पुढील आदेशापर्यंत सुरू राहणार असून, नमुद आदेशाचा भंग करणाऱ्या व्यक्ती भारतीय न्याय संहिता २०२३ कलम २२३ अन्वये शिक्षेस पात्र राहील. तरीही शांतता राखण्यासाठी कायदा अंमलबजावणी पथकांचे समर्पण कौतुकास्पद आहे.