Amravati Zilla Parishad: अमरावती जिल्हा परिषदचे २८ विद्यार्थी व ४शिक्षक दिल्ली शैक्षणिक सहली करीता रवाना
मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापाञ यांनी दाखवली हिरवी झेंडी

अमरावती : जि. प. अमरावती मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अभिनव संकल्पनेतून प्रज्ञावंत विद्यार्थ्यांचा दिल्ली येथे शैक्षणिक सहल दौरा २५ मार्च ते २८ मार्च या चार दिवसकरिता नियोजित केली होती. या करीता अमरावती जिल्हा परिषद शाळेमधिल २८विद्यार्थी व चार शिक्षकांची निवड करण्यात आली.आज सकाळी प्राथमिक शिक्षणाधिकारी कार्यालय अमरावती येथुन सहली करीता रवाना करण्यात आले.
या वेळी मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापाञ,प्राथमिक शिक्षणाधिकारी डाॅ. अरविंद मोहीरे, उपशिक्षणाधिकारी बुध्दभूषण सोनोने,दिपक कोकतरे,शिक्षण विस्तार अधिकारी मोहम्मद असफाक यांनी हिरवी झेंडी दाखवून आणि सहभागी विद्यार्थी व शिक्षक यांचे स्वागत करुन या शैक्षणिक सहली करीता रवाना करण्यात आले. यावेळी विद्यार्थांचे पालक, वर्ग शिक्षक, मुख्याध्यापक, गटशिक्षणाधिकारी उपस्थित होते.
या शैक्षणिक सहली करीता चौदा तालुक्या मधुन प्रज्ञावंत विद्यार्थ्याची निवड करण्यात आली होती. सहलीकरिता विद्यार्थी रेल्वेने व विमानाने प्रवास करणार असून दिल्ली येथे राष्ट्रपती भवन,संग्रहालय, इंदिरा गांधी स्मारक,राजघाट,इंडिया गेट, दिल्ली मधिल आदर्श शाळा,अक्षरधाम मंदिर,लोटस मंदिर,लाल किल्ला,कुतुबमिनार ला भेट देणार आहेत.
यामध्ये सहभागी विद्यार्थी व शिक्षक यांना संपूर्ण खर्च अमरावती जिल्हा परिषद करीत आहे तसेच सर्वांचा विमा सुध्दा शिक्षण विभागाने काढला आहे. या शैक्षणिक सहली करीता सांस्क्रुती उमेश कडू कु. देवयानी गजानन देशमुख पियुश नंदू हिव्रले कु. मयुरी अमोल बोरेकर यासिर अहमद खान जावेद खान उम्मे कुलसम मोह. इम्रान कु. चंचल अनिल शिंदे अर्णव नितीन मेहरे शेख बिलाल शेख आरिफ हम्रान शेख मोहिब अथार कु. सुरेश गावई मनस रुपर बदकेरे मयूर मनोहर खडक प्रजावल सुनील तायडे कु. अदिती चेतन चाव्हान आयुष मंगेश काल्दाटे कु. देवश्री मोहन हराले कु. प्राजक्त संतोष तिमरि कु. वैष्णवी हरीचंद जारकर सरथाखरिदास कांताले लायबा तस्निस मोहम्मद. अश्थ शरद वैद्य अरहम सलीम मिर्झा कु. गुंजन निलेश अम्ले कु. एकता अमार्डीप कोंडेकर कु. अनुष्का दिपक युवनेट कु. भविका मारोती पचेरे सहभागी शिक्षक वीरेंद्र अॅडनानिंग ब्राह्मण, आशिष काच्चुलजी पांडे, कु. भारती सुनील कासे कु. सुनिता शालिग्रामजी लाहणे यांचा समावेश आहे.