ताज्या घडामोडी

Rajeev Kasbe: क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या प्रदेशाध्यक्षपदी राजीव कसबे

 

 

 

पुणे : शेतकरी नेते शरद जोशी यांच्या विचाराने शेतकऱ्यांचा लढा आक्रमकपणे लढण्याची ग्वाही देत क्रांतिकारी  शेतकरी संघटनेच्या प्रदेशाध्यक्षपदी औसा (जि. लातूर) येथील तडफदार कार्यकर्ते राजीव कसबे  यांची निवड संघटनेचे संस्थापक रविकांत तुपकर यांनी सोमवारी (दि.३) पुणे येथे केली.

राज्यभरातील सर्व जिल्ह्याच्या प्रमुख कार्यकर्त्यांची राज्यव्यापी निर्धार बैठक पुणे येथे झाली. यावेळी प्रदेश कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. यावेळी पत्रकार परिषदेत तुपकर यांनी चळवळीच्या आगामी दिशाबाबत भूमिका घेताना विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्षाला लोकलढ्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर योग्य धोरण घेण्यास भाग पाडू, असा इशारा दिला.

राज्यकार्यकारिणी जाहीर करताना समाजात शेतकरी वंचित उपेक्षित घटकासाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना त्यांची काम करण्याची क्षमता ओळखून प्रमुख पदे देताना राजीव कसबे  यांचा संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील संपर्क, त्यांचे संघटन कौशल्य, लोकसंवाद, लोकांची प्रश्न सोडवण्याची वस्तुस्थिती, नेतृत्व करण्याची आक्रमकता पाहून राज्य अध्यक्षपदाची जबाबदारी दिल्याने क्रांतिकारी शेतकरी संघटनेला बळ मिळेल, असा आशावाद व्यक्त केला. दरम्यान कसबे  यांच्या निवडीचे सत्तार पटेल, राजेंद्र मोरे, अरुणदादा कुलकर्णी, नवनाथ शिंदे यांच्यासह लातूर जिल्ह्यातील शेतकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी स्वागत केले आहे.

Facebook
शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: या पोर्टल वरील बातम्या,लेख,फोटो,विडियो कॉपी करू नये.