ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

जामुननाला परिसरात मिळाले बिबट्याचे ठसे

व्याघ्र प्रकल्पाच्या जंगलात लावले २५ ट्रॅप कॅमेरे : मृत्युमुखी पडलेल्या चिमोटे यांच्या परिवाराला वनविभागाकडून पाच लाख रुपयांचा धनादेश

 

 

 

चिखलदरा : तालुक्यातील व्याघ्र प्रकल्पाच्या परिसरात असलेल्या खोंगडानजीक जामुनाला परिसरात बिबट्याच्या पायांचे ठसे आढळून आले असल्याचे व्याघ्र अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे केली येथील विनोद चिमोटे याच्यावर वाघाने हल्ला केला की इतर कुठल्या वन्यप्राण्याने, हे अजून स्पष्ट व्हायचे आहे. परिसरातील जंगलात तब्बल २५ कॅमेरे ट्रॅप लावण्यात आले आहेत.

वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात ठार झालेला केली गावातील विनोद चिमोटे याची पत्नी निर्मला चिमटे हिला मंगळवारी पाच लक्ष रुपयांचा धनादेश मंगळवारी उपवनसंरक्षक यशवंत बहाडे व वनपरिक्षेत्र अधिकारी अभय चंदेल यांनी दिला. यावेळी सरपंच, पोलिस पाटील, वनकर्मचारी, आमदार केवलराम काळे यांचे प्रतिनिधी म्हणून यशवंत काळे उपस्थित होते. एकूण २५ लाखांची मदत दिली जाणार आहे. यापैकी १५ लाख रुपये फिक्स डिपॉझिट शासन निर्णयानुसार केले जातात. उर्वरित पाच लाख रुपये इतर कागदपत्रे गोळ्या केल्यानंतर दिले जाणार असल्याचे व्याघ्र प्रकल्पाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

 

अधिकारी, कर्मचाऱ्यांची पाहणी, परिसरात बिबट्याचे पंजे केली येथून मासे विक्रीसाठी जामली आर येथे आलेल्या विनोद चिमोटे याच्यावर वन्यप्राण्याने हल्ला चढून त्याला ठार केल्याचे सोमवारी उघडकीस आल्यानंतर परिसरात एकच दहशत पसरली होती. पोलिसांनी प्रथमदर्शी वाघ असल्याचे स्पष्ट केले. परंतु, अहवाल शवविच्छेदन अहवालानंतर येणार आहे.

जामुनाला परिसरात विनोद चिमोटे यांचा मृतदेह आढळून आल्यानंतर व्याघ्र प्रकल्पाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी केलेल्या पाहणीत परिसरात बिबट्याच्या पायांचे ठसे आढळून आले असल्याचे जामली आर येथील प्रभारी वनपरिक्षेत्राधिकारी अभय चंदेल यांनी ‘खरा संवाद’शी बोलताना सांगितले.

शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: या पोर्टल वरील बातम्या,लेख,फोटो,विडियो कॉपी करू नये.