क्राइममहाराष्ट्र

जामगाव शिवारातील नाल्यात आढळला मृतदेह

एक पाय अर्धवट स्थितीत; वन्य प्राण्यांनी तोडले लचके, की घातपात?

 

 

वरूड : शेंदूरजनाघाट पोलिस ठाण्याच्या हद्दीतील जामगाव (महेंद्री) शिवारातील नाल्यात ४४ वर्षीय इसमाचा मृतदेह आढळून आला. एक पाय अर्धवट स्थितीत आढळल्याने हा घातपात आहे की वन्य प्राण्यांनी लचके तोडले, याबाबात तर्क-वितर्क लावले जात आहेत. पोलिस सूत्रांनुसार, अशोक केशव मरस्कोल्हे (४४, रा. जामगाव) असे मृताचे नाव आहे. रविवारी सकाळी ७ च्या सुमारास परिसरातील शेतकरी शेतात गेले असता, जामगाव (महेंद्री) शिवारातील नाल्यात मृतदेह आढळून आला. यामुळे एकच खळबळ माजली. याबाबत शेंदूरजना घाट पोलिसांना माहिती देण्यात आली.

मृतदेहाचा वनविभागाकडून पंचनामा मृतदेहाचा डावा पाय अर्धाच आढळला. यामुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. कारण, ज्या नाल्यामध्ये हा मृतदेह आढळून आला, त्या परिसरात त्यांचे शेत आहे. हिंस्त्र प्राण्याने मृतदेहाच्या पायाचे लचके तोडले असावे, असा अंदाज व्यक्त होत असल्याने घटनेची माहिती वन विभागाला दिली.

शवविच्छेदन अहवालाची प्रतीक्षा अशोकचा मृत्यू वन्यजीवांच्या हल्ल्यात झाला की घातपाताने, हे शवविच्छेदन अहवालात स्पष्ट होईल. तथापि, पाय गायब असण्याशिवाय हिंस्त्र प्राण्याने हल्ला केल्याच्या कुठल्याही खुणा मृतदेहावर आढळून आल्या नसल्याचे प्रत्यक्षदर्शीचे म्हणणे आहे.

शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: या पोर्टल वरील बातम्या,लेख,फोटो,विडियो कॉपी करू नये.