शेतकरी चुकाऱ्यापासून वंचित, जिल्हाधिकाऱ्यांना दिला इशारा
शिवसेनेनेचा जिल्हा प्रशासनाकडे निवेदनाद्वारे मागणी

अमरावती : शेतकऱ्यांच्या चुकाऱ्याला होत असलेल्या विलंबामुळे शिवसैनिक संतप्त झाले असून, या विषयावर मंगळवारी जिल्हा कचेरीवर शिवसैनिक व शेतकऱ्यांनी धडक दिली. यावेळी सोयाबीनचे चुकारे अदा करण्याचा मागणी शिवसेना (उबाठा) चे जिल्हाप्रमुख पराग गुडधे यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने सोयाबीनचे चुकारे अदा करण्याचा मागणी निवेदनाद्वारे केली आहे.
शासकीय किमान आधारभूत हमी भावानुसार नाफेडमार्फत सोयबीन खरेदी सुरू होती. ही खरेदी अमरावती खरेदी विक्री संस्थेमार्फत केली जात आहे. सहा फेब्रुवारीपर्यंत खरेदी केलेले बरेचसे सोयबीन वखार महामंडळाच्या गोदामात जमा करण्यासाठी पाठविलव असतव. हा साठा नाकारल्याचा आरोप पराग गुडधे यांनी केला आहे. नियानुसार एफएक्यू प्रतीचा माल खरेदी करून तो नियोजित गोदामामध्ये जमा करण्याची जबाबदारी सबएजंट संस्था म्हणून कार्यरत असलेल्या खरेदी-विक्री संस्थेची आहे. सोयाबीन खरेदी केलेला साठा अद्यापही गोदामात जमा न झाल्याने या सोयाबीनची तसचे शेतकऱ्यांच्या चुकाऱ्यांची जबाबदारी खरेदी-विक्री संस्थेची असून, अद्यापही शेतकऱ्यांना चुकारे मिळाले नाहीत, असा आरोप पदाधिकाऱ्यांनी केला आहे. खरेदी-विक्रीच्या मार्फत शेतकऱ्यांचा माल मोजून घेऊन, चाळणी करून त्यांना काटा पावती देऊन सुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे केले नाहीत. ही पावती देतेवेळी शेतकऱ्यांचा माल उत्कृष्ट दर्जाचा होता. त्याच्या आधारेच काटा पावती दिली आणि नंतर तोच माल नाफेडच्या मार्फत रिजेक्ट केला. मग शेतकऱ्यांचा माल गेला कुठे? याचीही सखोल चौकशी आर्थिक गुन्हे शाखेच्या मार्फत करण्याची मागणी शिवसेनेने केली आहे. संबंधित ग्रेडर, व्यवस्थापक व मोठे व्यापारी यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करून त्यांच्याकडून शेतकऱ्यांचे पैसे वसूल करावे, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा उपजिल्हाप्रमुख राजेश बंड, भय्यासाहेब निर्मळ, माजी जि. प. सदस्य नितीन हटवार, रामदास बैलमारे, विजय लुळे, सौरभ देशमुख, डॉ. नरेंद्र निर्मळ आदीनी दिला आहे.