ताज्या घडामोडीमहत्वाचेमहाराष्ट्र
Buldhana : पाणीपुरवठा योजनेचे काम तातडीने पूर्ण करण्यासाठी युवकाचे बेमुदत अन्नत्याग आंदोलन

Buldhana :- जल जीवन मिशन अंतर्गत असलेल्या वरवंड येथील पाणीपुरवठा योजनेचे काम तातडीने पूर्ण करावे व योजनेच्या कामात झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यासाठी गेल्या तीन दिवसांपासून वरवंड येथील दत्तात्रय जेऊघाले हे बेमुदत अन्नत्याग आंदोलनाला बसले आहे.
आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी संबंधित अधिकारी येऊन उडवाउडवीचे उत्तर दिले. तर शासकीय कंत्राट लक्ष्मण देशमुख यांना ब्लॅक लिस्ट करून झालेल्या निकृष्ट दर्जाचे कामाची चौकशी करावी अशी मागणी उपोषण कर्ते दत्तात्रय जेऊघाले यांनी केली आहे. आज उपोषणाचा तिसरा दिवस असून अद्याप पर्यंत आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी उपोषण मंडपाला भेट दिली नसल्याचे हे जेऊघाले यांनी सांगितले आहे.