Buldhana : बीड मारहाण प्रकरणातील कैलास वाघ यांची आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी अशी सरकारकडे मागणी

बुलढाणा :- बीड येथील मारहान प्रकरण संपूर्ण राज्यात गाजत आहे.आता सुरेश धस यांच्या नजीक असलेला सतीश भोसले याने दीड वर्षांपूर्वी एका व्यक्तीला बॅट ने जबर मारहान व्हिडीओ वायरल झाला. त्या घटनेतील मार खात असलेला कैलास वाघ हा सिंदखेडराजा तालुक्यातील माहेरखेड या गावातील रहिवासी आहे.
दीड वर्षांपूर्वी व्यक्तीला बॅट ने जबर मारहान
कैलास वाघ हे बीड जिल्ह्यातील एका गावात पोकल्यांड वर ऑपरेटर म्हणून काम करीत होता. त्या कामाचे पैसे दिले नाही, म्हणून कैलास वाघ घरी माहेरखेड ला निघून आला होता. तेव्हा बीड जिल्ह्यातील काही सात आठ जण कैलास च्या घरी येऊन त्याला बीड जिल्ह्यात घेऊन गेले व तिथे बेदम मारहाण केली. अतोनात दहा दिवस अत्याचार केले, हाल हाल केले. डोक्यावरील केस उपटले, पाय मोडला, अवघड ठिकाणी पेट्रोल, तिखट टाकले, कपडे काढून मारले त्यानंतर कैलास वाघ पळून आला व जीव वाचवीला. तेव्हाच सिंदखेडराजा पोलिसात कैलास वाघ ने तक्रार दिली होती, मात्र त्यावेळी पोलिसांनी कुठलीच दखल घेतली नाही. आता आमदार सुरेश धस यांना भेटायचे आहे, त्यांना हा सर्व प्रकार सांगायचा असल्याचे कैलास म्हणतो, तसेच जर आरोपीना फाशीची शिक्षा करावी, अशी मागणी वाघ यांनी केलीय.