ताज्या घडामोडीमहत्वाचेमहाराष्ट्र

भर उन्हाळ्यात सहन करावा लागणार खिळखिळ्या एसटी बसचा ताप !

अमरावती : अनेक वर्षापासून प्रतीक्षेत असलेल्या नव्या एसटी गाड्यांनी अमरावतीकरांना हुलकावणी दिली आहे. अलीकडे एकही नवीन बसगाडी जिल्ह्यातील आगारास मिळाली नाही.

उपलब्ध गाड्या सातत्याने ब्रेकडाऊन होत आहेत. सध्या आगारात असलेल्या ३३२ बसपैकी १३ व १४ वर्षाचा कार्यकाल ओलांडलेल्या ७६ एसटी बस आहेत. नागपूर आगारामध्ये नव्या एसटी बस दाखल झाल्या. मात्र, अमरावतीसह विभागातील आगारांना त्यांची प्रतीक्षा आहे. अमरावती शहर हे विभागाचे मुख्यालय असल्याने या ठिकाणाहून अनेक लांब, मध्यम आणि जिल्हांतर्गत एसटी बसच्या फेऱ्या सोडल्या जातात. या आगारातील बहुतांश वाहनांनी सहा ते दहा लाख किलोमीटरचा टप्पा पार केला आहे, हे विशेष.

उन्हाळ्यामध्ये उत्पन्नवाढीवर भर सणासुदीव्यतिरिक उन्हाळा सुटीत व लग्नसराईत एसटीत प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते. त्यामुळे यंदा उन्हाळ्यामध्ये उत्पन्न वाढवण्याबाबत अधिकाऱ्यांच्या बैठका सुरू आहेत. खिळखिळ्या बसेसमुळे मात्र मर्यादा आहेत.

एसटी महामंडळाकडे जुन्या गाड्यांपैकी आजघडीला १३ वर्षे झालेल्या ३३ आणि १४ वर्षांची कालमर्यादा ओलांडलेल्या ४३ एसटी बसेस आहेत.

 

प्रवासी भंगार गाड्यांना कंटाळले परिणामी, सध्या उपलब्ध असलेल्या बसेसची संख्या अपुरी आहे. अमरावती विभागासाठी नव्याने १५० हून अधिक बसची गरज आहे. मात्र, ती मागणी केवळ कागदावरच आहे. दरम्यान, तीन महिन्यांपूर्वी नव्याने बस दाखल होतील, असे विभागाचे अधिकारी सांगत होते. मात्र, अद्याप निर्णय झालेला नाही.

 

जिल्ह्यातील वेगवेगळ्या आगारांत नव्याने बस मिळण्याची प्रक्रिया सुरू आहे. अमरावती विभागाकरिता नवीन बसची मागणी केलेली आहे. नवीन बस येत्या एप्रिल महिन्यापर्यंत मिळण्यासाठी शक्यता आहे.

-नीलेश बेलसरे, विभागीय नियंत्रक

शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: या पोर्टल वरील बातम्या,लेख,फोटो,विडियो कॉपी करू नये.