ताज्या घडामोडीमहाराष्ट्र
सुधाकर टिपरे यांची मानवाधिकार सहायता संघ-भारत महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष (पत्रकार संघ) पदी नियुक्ती

-सचिन इंगळे (प्रतिनिधी)अंजनगाव सुर्जी येथील कृषी साहित्य व्यावसायिक व अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष सुधाकर टिपरे यांची महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष (पत्रकार संघ) मानवाधिकार सहायता संघ-भारत पदी नियुक्ती करण्यात आली आहे भारत देशात मानवाचे अधिकार,अवमान व एकत्रिकरणाच्या प्रचार प्रसारासाठी केंद्रीय अध्यक्ष सोनूसिंह राठोड यांनी ही नियुक्ती केली आहे. सुधाकर टिपरे यांच्या नियुक्तीने त्यांच्या समर्थकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले असून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.सुधाकर टिपरे यांचे पत्रकारिता क्षेत्रात असलेली पकड आणि उत्कृष्ठ कामगिरी तसेच त्यांचा संघटनात्मक बांधणी ह्यामुळे ही नियुक्ती करण्यात आली.