Holi celebration: अमरावतीत दृष्टिहीन दिव्यांग बांधवांसोबत अनोखे ‘इको-फ्रेंडली धूलिवंदन’

अनोख्या होळीचा रंगोत्सव साजरा
अमरावती : वानमाला बहुद्देशीय संस्था, साद फाउंडेशन आणि दिशा बहुद्देशीय संस्था स्वराज्य प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने अनोख्या होळी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. डॉ. नरेंद्र भिवापूरकर अंध विद्यालयात १३ मार्च २०२५ रोजी ‘इको-फ्रेंडली धूलिवंदन’ कार्यक्रम पार पडले विशेष म्हणजे हा सण दृष्टिहीन बांधवांसोबत साजरा करण्यात आला
कोरड्या रंगांची होळी, नव्या संकल्पांची उधळण, हर्षरंग सोहळा!
सणासुदीच्या उत्सवात कुणीही उपेक्षित राहू नये, या हेतूने हा अनोखा उपक्रम दरवर्षी आयोजित केला जातो. दृष्टिहीन तसेच दिव्यांग विद्यार्थ्यांना सुरक्षित आणि पर्यावरणपूरक पद्धतीने होळीचा आनंद लुटला यासाठी कोरड्या रंगांची होळी खेळल्यागेली सणाचा आनंद, स्पर्शाच्या माध्यमातून अनुभवता यावा, यासाठी विविध गाण्यांसह पारंपरिक पद्धतीने हा उत्सव साजरा झाला
समाजासाठी सकारात्मक संदेश
या उपक्रमामुळे दिव्यांग बांधवांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. हा कार्यक्रम फक्त एक सण नसून, समता, समरसता आणि आनंद यांचे प्रतीक आहे. विविध सामाजिक संस्था आणि नागरिक यामध्ये सहभागी झाले होते.
शहरातील युवक मोठ्या प्रमाणात या रंगपंचमी उत्सवात सहभागी होऊन दृष्टिहीन विद्यार्थी विद्यार्थ्यांना सोबत रंगपंचमी खेळून त्यांना आनंद लुटता यावा हाच या मागचा हेतू आहे. सोबतच संगीताच्या तालावर दृष्टीहीन विद्यार्थी विद्यार्थ्यांनी तसेच तेथील कर्मचारी ताल धरला होता. या कार्यक्रमाला शहरातील उपस्थित इलेक्ट्रॉनिक्स मीडिया, प्रिंट मीडिया, वृत्तपत्र छायाचित्रकार, छायाचित्रकार आणि तसेच शहरातील विविध सामाजिक क्षेत्रातील काम करणारी मंडळी या रंग उत्सवात त्यांनी हजेरी लावली होती सर्वांनी याच्यात आनंद लुटला. तसेच युवती व महिलांचा सहभाग होता.