Shiv Jayanti Samiti: शिवस्वराज्य स्थापनेमागची प्रेरणाच मातृशक्ती: विशाखा सपकाळे

शिवजयंती सांस्कृतिक समितीच्या वतीने कर्तुत्वान महिलांचा सन्मान
बुलढाणा : छत्रपती शिवाजी महाराज सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या सांस्कृतिक टीमच्या वतीने जागतिक महिला दिन पर्वावर, मातृतीर्थ जिल्ह्यातील कर्तुत्वान महिलाचा सन्मान करत.. राजमाता जिजाऊ माँ साहेबांच्या भूमीत “सन्मान कर्तुत्वाचा, स्वाभिमान स्त्रीत्वाचा..” या मातृविषयक उपक्रमाची नोंद केली. यावेळी मराठी अभिनेत्री विशाखा सपकाळे हिने शिवस्वराज्य स्थापनेमागची प्रेरणाच मातृशक्ती असल्याचे सांगून, हा महिलांचे व्यक्तित्वाचा नाहीतर कर्तृत्वाचा सन्मान असल्याचे सांगितले !
बुलढाणा अर्बनच्या गोवर्धन सभागृहात मंगळवार ११ मार्च रोजी सायंकाळी पार पडलेल्या या मातृमय कार्यक्रमाचे उद्घाटन माजी नगराध्यक्ष पूजाताई संजय गायकवाड यांनी केले. उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री ठाकरे व जालना येथील महसूल अधिकारी सौ. प्रतिभा पायघन यांची विशेष मार्गदर्शन लाभले.
११ मार्च छत्रपती संभाजी महाराजांचा बलिदान दिवस असल्याने, सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष राजेंद्र काळे, सचिव उमेश शर्मा, सांस्कृतिकचे अध्यक्ष शैलेश खेडेकर, शिवजयंती सोहळ्यात छत्रपती शिवरायांची वेशभूषा केलेले विशाल शेळके तर राजमाता जिजाऊंच्या वेशभूषेतील अनुष्का जाधव यांच्याहस्ते छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार व पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
त्यानंतर राजमाता जिजाऊ, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, माता रमाई व ताराबाई शिंदे यांच्या प्रतिमेला प्रमुख अतिथी असणाऱ्या सौ. कीर्तीताई पऱ्हाड, सौ. मालती शेळके. सौ. मीनलताई आंबेकर, ॲड.शर्वरी तुपकर, डॉ.अस्मिता चिंचोले, डॉ. माधवी जवरे, सौ. किरण भुसारी, ब्रह्मकुमारी उर्मिला दीदी, सौ. गायत्री काळे, सौ. सुनीता शर्मा व सौ. वैशाली ठाकरे यांनी पुष्प अर्पण करून अभिवादन केले. प्रेम इंगळे संचलित युनिसन गिटार अकॅडमीचे प्रितेश पावडे, शेख जाहेद, सौरभ सोनवणे, मयुरेश जोशी यांनी संतूरवादन करून कार्यक्रमाला सुरुवात केली. यावेळी मयूर परमार यांनी मुलींवर तयार केलेल्या चित्रफितीचे प्रदर्शन करण्यात आले.
यानंतर सौ.प्रीती मयूर देशमुख,कु.पौर्णिमा सोनुने, सुमन तुकाराम चौधरी, कु.नम्रता रिढे, सौ.मनीषाताई कोठारी, पंचफुला छगन सुरोशे, सौ.निकीता मापारी,सौ.मोनिका साळवे, सौ.रोहिणी मयुर बाहेकर ,डॉ.सौ. रूधीरा चैतन्य जाधव, संगीता पंजाबी, कु.भाग्यश्री शहाणे,सौ.वर्षा राजनकर, सविता आराख, ॲड. सौ.सोनाली सावजी, सौ.रूपाली गायकवाड ,कु.श्रुती दिलीप तायडे, सौ. साक्षी डांगे व सौ.प्रियंका सुरूसे या कर्तुत्वान महिलांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरल्या होत्या मराठी अभिनेत्री विशाखा सपकाळे या. “जन्म बाईचा बाईचा खूप घाईचा..” या गाण्यावर परफॉर्म करणाऱ्या प्रा. रोहिणी देशमुख, ॲड. ज्योतीताई चव्हाण, चारुताई माळोदे, शिल्पाताई जयस्वाल, आम्रपाली चव्हाण, गौरीताई वर्मा व मीनलताई मुंदडा यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला..कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.अमोल वानखेडे यांनी, प्रास्ताविक सौ.वैशाली वैराळकर यांनीतर आभार प्रदर्शन सौ. वैशाली ठाकरे यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राचार्य ज्योती पाटील, सौ. वैशाली तायडे, कल्पना माने, सौ.अर्चना जाधव, रोहिणी देशमुख, विजय किनोळकर, शाहीना पठाण, सौ.विजयाताई काकडे, शप्रज्ञाताई लांजेवार, सौ. आरती जोशी, वैशाली सोळुंकी, नेहाताई इंगळे, कु. शगुना डोंगरदिवे, कु.अर्पिता गवई, कु. मुक्ताताई अंभोरे, अजय जाधव, निर्मल पंजाबी, राहुल जाधव, मयूर परमार, रौनक पंजाबी, मानसी भुसारी, खुशी कुलकर्णी यांनी परिश्रम घेतले. बुलढाणा शहरातील शिवजयंती सोहळ्याच्या इतिहासातील हा पहिला महिला दिन सोहळा, निर्माण करून गेला होता ते मातृमय वातावरण !