Washim : विहिरीत पडलेल्या बिबट्याला जीवनदान; वन विभागाचा रेस्कु ऑपरेशन यशस्वी

Manora :- मानोरा तालुक्यातील मौजे हातोली शेत शिवारातील विहिरीत दि. १२ मार्चला पडलेल्या बिबट्याला वन विभागाच्या टीमने जाळीने सुखरूप बाहेर काढून जीवनदान दिले. हातोली शिवारातील एका विहिरीत बिबट्या पडल्याची माहिती शेतकऱ्यांनी वनविभागाला दिली. वनविभागाची टीम घटनास्थळी दाखल होत बचाव कार्य सुरू केले. ..
काही काळ निरीक्षणाखाली ठेवून बिबट्याला नैसर्गिक अधिवासात सोडले
वन परिक्षेत्र मानोरा व आर आर यू पुसद च्या टीमने बिबट्याला विहिरीतून सुरक्षितरित्या बाहेर काढले. बिबट्याच्या बचाव कार्यात पुसदच्या टीमने मोठी भूमिका बजावली. बिबट्याला विहिरीतून सुखरूप बाहेर काढल्यानंतर त्याची प्राथमिक आरोग्य तपासणी करण्यात आली. बिबट्याला काही वेळ निरीक्षणाखाली ठेवण्यात येवून नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. सदरील बचाव मोहीम उपवनसंरक्षक अभिजीत वायकोस, यांच्या नेतृत्वात व सहाय्यक वनसंरक्षक शरयू रुद्रवार, वनपरिक्षेत्र अधिकारी पि. बी. सानप यांच्या देखरेखीखाली वन विभागाच्या टीमचे कर्मचारी गिरीश डांगे, शेख मुखबीर शेख गुलाब, रवी राठोड अश्विन राठोड, आर बी सोनवणे, एस पी राठोड, एस बी शिरसाट, व्ही. बी चतुरकर, सीमा पांडे व इतरांनी राबवली.