वाळू तस्करांवर आयपीएस प्रशांत डगळे यांची मोठी कारवाही

•आरोपींमध्ये युवा स्वाभिमानाच्या जिल्हाध्यक्षांचा सामावेश
▪एक कोटी एकवीस लाखाचा मुद्देमाल जप्त;तर पाच जणांवर गुन्हा दाखल
श्रीकांत नाथे
अंजनगाव सुर्जी : दिवसेंदिवस वाळू तस्करीत वाढ होत असून 13 मार्च 2025 रोजी 10 वाजताच्या सुमारास वाळू तस्करांविरुद्ध अंजनगाव सुर्जी तालुक्यात पहिल्यांदाच मोठी कारवाही झाल्याचे समोर आले आहे.एक कोटी एकवीस लाखाचा मुद्देमाल जप्त करून पाच आरोपींवर खाण खनिज अधिनियम अन्वये परि.सहा.अधीक्षक प्रशांत डगळे (ठाणेदार) यांनी धडक कारवाही केल्याचे समोर आले आहे.या कारवाहीमुळे वाळू तस्कारांवर लगाम बसली असून हे तालुक्यातील वाळू तस्करांचे मोठे प्रकरण उघडकीस आल्याची चर्चा आहे.
माहितीप्राप्तीनुसार अंजनगाव सुर्जी पोलीस स्टेशन हद्दीत आयपीएस प्रशांत डगळे यांनी होळीच्या पर्वावर कडक बंदोबस्त तैनात केला असता अंजनगाव सुर्जी येथील नवीन बस स्थानक ते विठ्ठल मंदिर परिसरात अवैध वाळू वाहून नेणारे तीन ट्रक ज्यांचे गाडी नंबर एम एच 37 पी 2772, एम एच 27 बी एक्स 9644 आणि यु पी 72 बी टी 8384 पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.ट्रक समवेत खनिज संपत्ती एकूण अंदाजे एक कोटी एकवीस लाख वीस हजार (1,21,20,000) रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.तर सदर ट्रकमध्ये वाळू वाहून नेणारे आरोपी अलताफ मो सादिक (24) रा.अंजनगाव सुर्जी,आरोपी मो सलीम मो रशीद (54) रा.कांडली परतवाडा, आरोपी आबाद अली मो शरीफ रा.अमरावती, आरोपी अजय सुरेश देशमुख रा.चिंचोली, आरोपी मो साजिद मो युसुफ रा.परतवाडा असे आरोपींचे नावे आहेत.तर पोलिसांनी आरोपींविरुद्ध 145/2025 बीएनएस कलम 302 (2) सहकलम 21 खाण आणि खनिज अधिनियम 1957 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.