ताज्या घडामोडीमहत्वाचेमहाराष्ट्र

पथ्रोट पोलिसांनी वाळू वाहणारे तीन ट्रक पकडले

पथ्रोट : मध्य प्रदेशातून विनापास वाळू वाहतूक करणारे तीन मोठे ट्रक ठाणेदार प्रशांत डगळे यांच्या मार्गदर्शनात पथ्रोट पोलिसांनी पकडले. एकूण १ कोटी २१ लाख २० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

अंजनगाव सुर्जी नवीन बस स्टॅन्ड ते विठ्ठल मंदिर परिसरात १३ मार्च रोजी रात्री १० च्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. येथे बंदोबस्ताला असलेले वाहतूक पोलिस राजाराम मेसरे, सरदार व कासदेकर यांना एमएच ३७ टी २७७२, एमएच २७बीएक्स ९६४४, यूपी ७२ बीटी ८३८४ क्रमांकाचे ट्रक वाळू

वाहतूक करताना आढळले. तिन्ही ट्रक ठाण्यात लावण्यात आले. चालक मो. अल्ताफ मो. सादिक (२४, रा. शहापुरा अंजनगाव सुर्जी), मो. सलीम मो. रशीद (५४, रा. कांडली), आबाद अली मो. शरीफ (३८, रा. पॅराडाईज कॉलनी, अमरावती) यांना ताब्यात घेऊन कायदेशीर कारवाईनंतर सोडण्यात आले. ट्रकमालक अनुक्रमे अजय सुरेश देशमुख (रा. चिंचोली), मो. साजिद मो. युसुफ (रा. परतवाडा), आबाद अली मो. शरीफविरुद्ध गुन्हे दाखल केले.

दरम्यान, शासकीय सुटी असल्याने परवाने उपलब्ध झाले नाही. त्यामुळे तपासणी नाक्यावर वाळू भरलेले अनेक ट्रक शून्य रॉयल्टीच्या प्रतीक्षेत उभे आहेत.

शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: या पोर्टल वरील बातम्या,लेख,फोटो,विडियो कॉपी करू नये.