कृषीताज्या घडामोडीमहाराष्ट्र

स्प्रे पंपाला १०० टक्के अनुदान, किती शेतकऱ्यांनी केले डीबीटीवर अर्ज?

कापूस, सोयाबीनसह तेलबिया उत्पादकता वाढीसाठी योजना

अमरावती : कापूस सोयाबीन व इतर तेलबियांची उत्पादकता वाढ व मूल्यसाखळी विकासासाठी विशेष कृती योजना सन २०२४-२५ साठी जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. या अंतर्गत जिल्ह्यात डीबीटी योजनेंतर्गत १०० टक्के अनुदानातून १४,३३० स्प्रेपंप शेतकऱ्यांना वाटण्यात आलेले आहे.

या योजनेंतर्गत बॅटरी ऑपरेटेड फवारणीपंपाचा १०० टक्के अनुदानावर पुरवठा करण्यात आलेला आहे. महाडीबीटीवर करण्यात आलेल्या ऑनलाइन अर्जाची छाननी करण्यात आली व ऑनलाइन ड्रॉ पद्धतीने हे पंप शेतकरी लाभार्थ्यांना वितरित करण्यात आलेले आहे. जिल्ह्यातील ५,९०५ शेतकऱ्यांना कॉटनसाठी, तर ८,४२५ शेतकऱ्यांना सोयाबीन पिकासाठी हे पंप देण्यात आले. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

१४ हजार शेतकऱ्यांची निवड योजनेत जिल्ह्यासाठी १,४३३० लक्ष्यांक निश्चित करण्यात आला होता व त्याच प्रमाणात बॅटरी ऑपरेटेड फवारणी पंप वितरित करण्यात आले.

फवारणी पंपासाठी प्राप्त अर्जसंख्या जिल्ह्यात सन२०२४-२५ या वर्षाकरिता १४,३३० हे टार्गेट देण्यात आले होते. यामध्ये ५,९०५ शेतकऱ्यांना कॉटनसाठी, तर ८,४२५ शेतकऱ्यांना सोयाबीन पिकासाठी हे पंप देण्यात आले. प्रत्येक तालुक्यात १०२३ पंप वाटप करण्यात आल्याचे कृषी विभागाने सांगितले.

लॉटरी पद्धतीने निवड योजनेंतर्गत बॅटरी ऑपरेटेड फवारणी पंपासाठी महाडीबीटीवर करण्यात आलेल्या ऑनलाइन अर्जाची छाननी करण्यात आली व त्यानंतर राज्यस्तरावरुन ऑनलाइन ड्रॉ पद्धतीने हे बॅटरी ऑपरेटेड फवारणी पंप शेतकरी लाभार्थीना वितरित करण्यात आलेले आहे.

पात्रतेसाठी निकष काय?

एका सातबारावर एका शेतकऱ्याला एकच कृषिपंप दिल्या जातो. शेतकऱ्याचा सातबारा, आठ अ, आधारकार्ड आवश्यक आहे.

पती व पत्नीच्या नावे सातबारा असेल त्यापैकी एकालाच या स्प्रे पंपाचा लाभदेण्यात आलेला आहे.

यावर्षीही करता येणार अर्ज महाडीबीटी अंतर्गत शेतकऱ्यांना यावर्षदिखील अर्ज करता येणार आहे. शासनाद्वारा लक्ष्यांक प्राप्त झाल्यानंतर याबाबत प्रक्रिया होईल व निवड झालेल्या शेतकऱ्यांना स्प्रे पंपाचे वाटप करण्यात येणार आहे.

श्रम, वेळेत बचत योजनेंतर्गत बॅटरी ऑपरेटेड फवारणी पंप शेतकऱ्यांना मिळाल्याने कमी श्रमात व कमी वेळेत पिकांवर फवारणी करता येणे शक्य झाले आहे.

 

राज्य पुरस्कृत योजनेंतर्गत यावर्षी १४,३३० बॅटरी ऑपरेटेड फवारणी पंप शेतकऱ्यांना वितरित करण्यात आले.

राहुल सातपुते, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी

शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: या पोर्टल वरील बातम्या,लेख,फोटो,विडियो कॉपी करू नये.