ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

Car-Bike accident: सिंदगी शिवारात कार-दुचाकी अपघात; दोघे ठार तर एक जखमी

आखाडा बाळापूर  : कुरूंदा ते सिंदगी रस्त्यावर शुक्रवारी दुपारी भरधाव कार दुचाकी अपघातात दोघांचा मृत्यू झाला तर एक जण जख्मी झाला अपघातात रस्त्यावर एक शेळी ठार झाली असल्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक डी.बी.बसवंते व बिटप्रमुख पंढरीनाथ चव्हाण यांनी सांगितले. एका मयताचे पोत्रा प्रा.आ.केंद्रात तर दुसऱ्याच हिंगोली जिल्हा शासकीय रूग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. घटनास्थळी वरीष्ठ पोलीस अधिकारी यांनी भेट दिली.

याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कुरूंदा ते सिंदगी रस्त्यावर सिंदगी आबादी गावाजवळ कार एम एच 38 ए.डी 5324 व दुचाकी अपघात झाला. यात चंद्रकांत मारोती मिटकर (वय 26वर्षे) रा.कोठारवाडी ता.वसमत जागेवरच मृत्यू झाला तर हिंगोली येथे तातडीने उपचारासाठी हलवण्यात आलेल्या शंभू हनवता मिटकर वय 54 वर्षे रा.कोठारवाडी उपचारा दरम्यान मृत्यू झाला तर मारोती शंभू मिटकर यांच्यावर उपचार सुरू आसल्याच बिटप्रमुख पंढरीनाथ चव्हाण यांनी सांगितले. या  अपघातात एक शेळी ठार झाली होती.

घटनास्थळी अतिरिक्त पोलीस अर्चना पाटील, पोलीस निरीक्षक विष्णुकांत गुट्टे, सहाय्यक पोलीस निरीक्षक डी.बी.बसवंते, पंढरीनाथ चव्हाण, परमेश्वर सरकटे,राजेश मुलगीर,प्रवीण चव्हाण पोलीस पथकाने भेट दिली.

अपघातात दुचाकीच मोठ नुकसान

भरधाव कार व दुचाकी झालेल्या अपघातात दोघांना जिव गमवावा लागला तर एक जण जख्मी झाला या अपघातात दुचाकी समोरील भाग चुराडा झाला. अपघातानंतर ग्रामस्थांनी तातडीने जख्मीना हिंगोली शासकीय रुग्णालयात उपचारासाठी हलवले.

शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: या पोर्टल वरील बातम्या,लेख,फोटो,विडियो कॉपी करू नये.