Pathari Crime: परभणीत कर्तव्यावर असलेल्या होमगार्डच्या नाकावर दगड मारून केले जखमी

परभणीच्या पाथरी येथील घटना; दोन आरोपींविरोधात गुन्हा नोंद
परभणी/सेलू : शहरातील नगरपरिषद परिसरात सोमवारी कायदा व सुव्यवस्था बंदोबस्त करीत असताना गोंधळ घालत हातातील दगडाने कर्तव्यावर असलेल्या एका होमगार्डला दगड मारून जखमी करणे. शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी दोन आरोपी विरोधात सोमवारी रात्री उशिरा पाथरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
आरोपीविरोधात पाथरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
पाथरी नगरपालिका (Pathari Crime) कार्यालय परिसरामध्ये सोमवार १७ मार्च रोजी दुपारी १२.३० च्या सुमारास फिर्यादी पो.शि.ब्रम्हानंद कोल्हे व इतर पोलीस कर्मचारी कायदा व सुव्यवस्था बंदोबस्त करण्यासाठी कर्तव्यावर होते. यावेळी आरोपी मोहम्मद युनूस मोहम्मद नूर कुरेशी, आयुब खान दोघे रा .पाथरी गोंधळ करून व हातात दगड घेऊन कर्तव्यावर असलेले होमगार्ड दबडगे यांना त्यांच्या नाकावर दगड फेकून मारून जखमी करून शासकीय कामात अडथळा निर्माण केला, म्हणून आरोपी विरुद्ध पाथरी पोलीस ठाण्यात सोमवारी रात्री उशीर पोलीस शिपाई ब्रह्मानंद कोल्हे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी मोहम्मद युनूस मोहम्मद नूर कुरेशी, आयुब खान यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी पुढील तपास तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक कापुरे करित आहेत. घटनास्थळी पोलीस निरीक्षक महेश लांडगे स.पो.नि.कापुरे यांना भेट दिली आहे.