शहरातील शहापुरा भागात पाणीपुरवठा करणारी पाईप लाईन फुटली

प्रतिनिधी श्रीकांत नाथे*अंजनगाव सुर्जी :* शहरातील अंतर्गत शहापुरा भागात पाणीपुरवठा करणारी पाईप लाईन फुटली. त्यामुळे पाण्याची नासाडी हाेत असून, या भागात पाण्याचे माेठे डबके तयार झाले आहे आणि त्याठिकानावरील रहदारी पुर्णतः बंद पडल्याने नागरिक संतप्त भावना व्यक्त करीत आहेत.
उन्हाळा असल्याने गर्मीपासून सुटका करण्यासाठी प्रत्येकाने घरी कूलर लावले आहेत. त्यामुळे पाण्याचा वापर वाढला आहे. पाण्याचा पुरवठा व वापर लक्षात घेता, अंजनगाव आणि दर्यापूर या दोन शहरांसह बहुतांश खेड्यांना शहानूर धरणाचे पाणी पोहचविले जाते. त्यामुळे संपूर्ण अंजनगाव सुर्जी शहरात एक दिवसांआड पाणीपुरवठा केला जाताे. अंजनगाव सुर्जी शहरातील शहापूरा भागात अकोट नाक्यावर रोडवर पाण्याचे डबके तयार झाले असून, पाण्याची नासाडी हाेत आहे. ही बाब लक्षात येताच स्थानिक नागरिकांनी नगर परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाला माहिती दिली असून ही समस्या साेडविण्याची मागणी केली आहे.
————————————————————————–
पाईप लाईन फुटल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाला देण्यात आली आहे. पाईप दुरुस्तीचे काम लवकरच दुरुस्त केले जाईल.
मिलिंद वानखडे
न.प.आरोग्य अधिकारी अंजनगाव सुर्जी