ताज्या घडामोडीमहत्वाचेमहाराष्ट्र

अ.भा ग्राहक पंचायतने प्लास्टिकमुक्त शहर करण्याची घेतली शपथ

 

प्रतिनिधी श्रीकांत नाथे*अंजनगाव सुर्जी :* पर्यावरण रक्षण आणि प्लास्टिकमुक्त शहर करण्यासंदर्भात अ.भा ग्राहक पंचायतच्या पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी दि.21 मार्च 2025 रोजी काठीपुरा स्थित बालाजी मंदिरात संपन्न झालेल्या बैठकीत दरम्यान शपथ घेतली.

यावेळी अ.भा ग्राहक पंचायतचे राष्ट्रीय सहसचिव जयंती भाई कथेरिया, प्रांत अध्यक्ष डॉ.नारायण मेहेरे, प्रांत संघटन मंत्री डॉ.अजय गाडे, पर्यावरण समन्वयक चौधरी साहेब व्यासपीठ मान्यवर म्हणून उपस्थित होते. मान्यवरांनी सांगितले की, समाजहिताचे कोणतेही कार्य सहकार्याशिवाय यशस्वी होऊ शकत नाही. त्यामुळे याबाबत सर्वांनी जागरूक होण्याची गरज आहे. पर्यावरण रक्षणाबाबत पालिकेशिवाय शहरातून प्लॅस्टिक संपवायचे असेल तर त्यासाठी सर्वांना सहकार्य करावे लागेल. तसेच सर्व वॉर्ड मधील आजी-माजी नगरसेवकांनी आपापल्या भागात पर्यावरण रक्षणाबाबत जनजागृती करावी. महत्वपूर्ण म्हणजे प्रत्येक घरातील सदस्यांनी आपल्या घरात आणल्या गेलेल्या प्लास्टिक पिशव्या जमा करून रिसायकलिंग करिता संस्थेला किंवा पालिकेला द्याव्या आणि शक्यतोवर कापडी पिशव्यांचा वापर करावा असे यावेळी म्हटले तसेच यावेळी त्यांनी समाजासमोर उद्भवत असलेल्या समस्याचे वेग-वेगळ्या गोष्टींमधून निराकरणरुपी वर्णन करून सांगितले.
यावेळी या बैठकीला अमरावती अ.भा.ग्राहक पंचायतचे जिल्हा सचिव आनंद दादा संगई, तालुकाध्यक्ष महेंद्र शिंदीजामेकर, शहराध्यक्ष शरयूताई महाजन, जिल्हा सदस्य संतोष गोलाईत, तालुका सचिव ओमप्रकाश कबाडे, मिनाक्षी ताई खेडकर, इशिता डोणगावकर सह शहरातील मान्यवर मंडळी उपस्थित होते.

शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: या पोर्टल वरील बातम्या,लेख,फोटो,विडियो कॉपी करू नये.