ताज्या घडामोडीमहत्वाचेमहाराष्ट्र
आयपीएस डगळे यांनी पर्यावरण स्वच्छतेसाठी घेतला पुढाकार
अंजनगाव सुर्जी पोलीस स्टेशन परिसरात राबविली स्वच्छ्ता मोहीम

प्रतिनिधी श्रीकांत नाथे
अंजनगाव सुर्जी :परि.सहायक पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे यांच्या सूचनेवरून आणि स्वतः पुढाकार घेऊन रविवार 23 मार्च 2025 रोजी अंजनगाव सुर्जी पोलीस ठाण्यांमध्ये व्यापक स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. ज्यामध्ये पोलीस कर्मचाऱ्यांनी श्रमदान करून परिसर व पोलीस स्टेशनची स्वच्छता केली. यावेळी पोलिसांनी स्वच्छता करून पर्यावरण रक्षण व स्वच्छतेचा संदेश दिला.
यावेळी आयपीएस प्रशांत डगळे यांनी म्हटले की, प्रत्येकाने स्वतःभोवती स्वच्छता राखली पाहिजे आणि त्यासाठी दुसऱ्यांना सुद्धा प्रेरित केले पाहिजे. स्वच्छता राखल्याने अनेक आजार आपोआप नाहीसे होतात आणि हे नियमितपणे सुरू ठेवले पाहिजे; जेणेकरून स्वच्छ आणि सुरक्षित वातावरणात काम करता येईल.