महावितरण अभियंत्याला दिली मारण्याची धमकी
अजनगाव सुर्जी भागातील शहापूरा येथील घटना

प्रतिनिधी श्रीकांत नाथे अंजनगाव सुर्जी :शहारातील महावितरणच्या सुर्जी विभागाचे सहायक अभियंता सुनील जाधव हे 21 मार्च 2025 रोजी सकाळी 9 ते 11 वाजताच्या दरम्यान शहापूरा येथील रहिवासी देवचंद इंगळे यांच्या घरी थकीत वीज बिल वसुली करिता गेले असता देवचंद याने घरातील त्रिशूल घेऊन महावितरण अभियंत्याच्या अंगावर धावला व जिवे मारण्याची धमकी देऊन शासकीय कामात अडथळा निर्माण केला.
सदर घटनेची नोंद अंजनगाव पोलीस स्टेशन मध्ये झाली असून शस्त्र अंगावर उगारणे, विद्रोहास उत्तेजन, व्यक्तीला नुकसान पोहचवणे, शासकीय कामात अडथळा निर्माण करणे अश्या प्रकारचे कृत्य देवचंद इंगळे (40) रा.शहापूरा याने केले. महावितरणचे अभियंता सुनील जाधव यांनी दिलेल्या फिर्यादी वरून देवचंद इंगळे विरुद्ध 132, 352, 351 (3) बीएनएस अन्वये पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.