दर्यापुर ते अकोला मार्गे दहिहांडा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक २७८ या रस्त्याचे नुतनीकरण व रुंदीकरणा संदर्भात गडकरींना दिले निवेदन

-सचिन इंगळे (प्रतिनिधी) दर्यापूर/अंजनगाव सुर्जी :
दर्यापुर ते अकोला मार्गे दहिहांडा रा म मार्ग क्र २७८ या रस्त्याची अक्षरशः चाळन झाली आहे या रस्त्या वरून कोणतेही वाहन चालवणे कठीण झाले आहे सदर रस्त्याचे नुतनीकरण व रुंदीकरण करण्या करिता केंद्रीय परिवहन मंत्री नितिन गडकरी यांना निवेदन देण्यात आले.
संत श्री अच्युत महाराज हार्ट हॉस्पिटलच्या नव्याने बांधलेल्या बिल्डिंग चे उद्घाटन केंद्रिय परिवहन मंत्री नितिनजी गडकरी यांचे हस्ते करण्यात आले या कार्यक्रमाचे वेळी दर्यापुर भाजपा चे माजी तालुका अध्यक्ष गणेश रेखे यांचे नेतृत्वात विजय गुप्ता यांचे उपस्थितीत सासन येथिल सामाजिक कार्यकर्ते सागर पाटील गिर्हे यांनी दर्यापुर ते अकोला मार्गे दहिहांडा रा म मार्ग क्र २७८ या रस्त्याचे दर्यापुर ते किनखेड फाट्या पर्यंत नुतनीकरण व रुंदीकरण करणे बाबत तसेच दर्यापुर ते अमरावती या रस्त्याची असलेल्या रहदारीचे मानाने रुंदी कमी असल्याने वारंवार अपघात होवुन जिवित व वित्त हानी होते म्हणून दर्यापुर ते वलगाव टी पॉईंट पर्यंत दोन्ही बाजूंनी एक एक मीटरने रूंदी वाढविणे बाबत केंद्रिय परिवहन मंत्री नितिनजी गडकरी यांना निवेदन देण्यात आले.