कृषीताज्या घडामोडीमहत्वाचेमहाराष्ट्र

दोन दिवसांत कशी होणार २.६६ लाख शेतकऱ्यांची नोंदणी?

अमरावती : अॅग्रिस्टॅक योजनेद्वारे शेतकऱ्यांना १२ अंकी फार्मर आयडी दिल्या जात आहे. यामध्ये आतापर्यंत २,५७,०७४ शेतकऱ्यांनी नोंदणी केलेली आहे. ही ५० टक्केवारी आहे. यासाठी शासनाने ३० मार्च डेडलाइन दिलेली आहे. त्यामुळे एक-दोन दिवसात योजनेसाठी उर्वरित २,६१,३३३ शेतकरी नोंदणी न झाल्यास शेतकऱ्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळणे कठीण होणार आहे.

केंद्र शासनाने शेतकऱ्यांना डिजिटल ओळख देण्यासाठी अॅग्रिस्टॅक योजनेद्वारे एक नोंदणी क्रमांक दिला जात आहे. शेतकऱ्यांची माहिती व शेतकरी ओळख क्रमांक तयार करण्याच्या अनुषंगाने • जिल्ह्यातील सीएससी केंद्रचालकांना तशा सूचना प्रशासनाद्वारा देण्यात आलेल्या आहेत. अपर आयुक्त महसूल यांच्याद्वारा प्राप्त सूचनांद्वारा शेतकऱ्यांचे ओळख क्रमांक तयार करण्यासाठी ३० मार्च ही डेडलाइन देण्यात आलेली आहे.

योजनेच्या प्रारंभाला तलाठी, ग्रामसेवक व कृषी यंत्रणांनी काम करण्यास नकार दिलेला आहे. त्यानंतर तलाठीस्तरावर अनेक गावांमध्ये शिबिर घेण्यात आल्याने योजनेचे काम ५० टक्क्यांपर्यंत आले आहे. फार्मर आयडी नसल्यास शेतकऱ्यांना शासन योजनांचा लाभ मिळणे कठीण होणार आहे.

 

तर योजनाचा लाभमिळणार नाही

शासन योजनांच्या लाभासाठी १२ अंकी डिजिटल ओळख क्रमांक यापूढे आवश्यक राहणार आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांजवळ फार्मर आयडी नाही, ते शेतकरी यापुढे शासन योजनांना मुकणार आहे.

पीएम किसान’च्या लाभात आडकाठी फार्मर आयडी नसल्यास पीएम किसान योजनेच्या २१ वा हप्ता मिळण्यास अडचणी येणार आहे. शिवाय नैसर्गिक आपत्तीचा शासन मदत निधी मदत मिळण्यास अडचणी येणार आहे. शेतकरी नोंदणीसाठी आधार कार्ड, लिंक असलेला मोबाइल क्रमांक, सात-बारा असल्यास सीएससी केंद्रांवरून नोंदणी करता येणार आहे.

 

मोर्शी तालुक्यात सर्वाधिक, चिखलदरा माघारले महसूल विभागाचे माहितीनुसार मंगळवारपर्यंत २,५७,०७४ शेतकऱ्यांनी फार्मर आयडी घेतलेला आहे. यामध्ये मोर्शी तालुक्यात सर्वाधिक २४,३०४, तर सर्वात कमी ७,३७३ चिखलदरा तालुक्यात आहे. टक्केवारीमध्ये धारणी तालुक्यात सर्वाधिक ६९.०८ टक्के, तर सर्वात कमी ३४.९० टक्के शेतकरी नोंदणी अमरावती तालुक्यात आहे. योजनेत शासकीय यंत्रणेचे असहकार्य असल्याने योजनेचे काम माघारले असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: या पोर्टल वरील बातम्या,लेख,फोटो,विडियो कॉपी करू नये.