ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

Chhatrapati Shivaji Maharaj: शिवसेना (उबाठा) व्दारे छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव थाटात साजरा

गुरूदेव सेवा मंडळाच्याभजनासह ” शिवरत्न ” लोकपयोगी कार्यालयाचे उद्घाटन

कन्हान  : शिवसेना (उबाठा) चे माजी खासदार मा. प्रकाश भाऊ जाधव यांचे व्दारे प्राथमिक आरोग्य केंद्रा सामोरिल महामार्गावर राजे छत्रपती शिवाजी महाराज  यांच्या मुर्तीची पुजा अर्चना करून जन्मोत्सवाची सुरू वात करून सायंकाळी विवेकानंद नगर येथे गुरूदेव सेवा भजन मंडळांचे भजनासह ग्रामोन्नती प्रतिष्ठान व शेतकरी कष्टकरी महासंघ आणि विवेकानंद सेवा मंड ळ ट्रस्ट कन्हान जि. नागपुर (महाराष्ट्र) या सेवाभावी संस्थेचे ” शिवरत्न ” लोकोपयोगी कार्यालयाचे उद्घाटन करून  राजे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव सोहळा थाटात साजरा करण्यात आला.

सोमवारला सकाळी ११.३० वाजता शिवसेना (उबाठा) रामटेक क्षेत्र माजी खासदार मा. प्रकाश भाऊ जाधव यांचे अध्यक्षेत प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान सामोर राष्ट्रीय महामार्गावर  राजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुर्तीची मा.प्रकाश भाऊ जाधव, माजी जि प उपाध्यक्ष मा. शरद भाऊ डोणेकर, हीराबाई शाळेचे संचालक मा. नरेंद्र वाघमारे, सार्थक पब्लिक स्कुलचे संचालक मा. भुषण निंबाळ कर, माजी नगरसेवक राजेश यादव, मा. मधुकर नाग पुरे, कोठीराम चकोले आदींच्या हस्ते महाराजांना पुष्प हार अर्पण व पुजा अर्चना करून ” जय भवानी , जय शिवाजी ” चा जयघोष करित जन्मोत्सव सोहळयाची थाटात सुरूवात करण्यात आली.

याप्रसंगी शालिकरा म ठाकरे, रतिराम सहारे, डॉ व्ही एम जुनघरे, ताराचंद निंबाळकर, नामदेव नवघरे, बालाजी नायर, किशोरी अरोरा, सुत्तम मस्के, रवि रंग, विठ्ठल ठाकुर, सुनिल सरोदे, रूमदेव मानकर, गुंडेराव भुते आदी सह बहु संख्येने मान्यवर उपस्थित होते.  राजे छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरापगड जातीच्या मावळयांना सोबत घेऊन रयतेचे स्वराज्य स्थापन करून मराठा राज्याचा विस्तार करून सर्वसामान्य रयतेला परकिय मुगघलां च्या गुलामगिरितुन मुक्त करून सुजालाम, सुफलाम स्वराज्य स्थापन केले. या अलौकिक कार्यामुळेच त्यां ची जयंती दररोज साजरी केली तरी ते कमीच पडेल. असे मान्यवरांनी उपस्थिताना मार्गदर्शन केले.

सायंकाळी ६.३० वाजता विवेकानंद नगर येथे माजी खासदार प्रकाशभाऊ जाधव यांचे निवासस्थानी  छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्प ण करून मा. बेहुणे महाराज यांचा गुरूदेव सेवा भजन मंडळा व्दारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या देशभक्ती पर भजनाचा कार्यक्रमाने उपस्थित मंडळी मंत्रमुग्ध झा ले. सर्व उपस्थितांना भगवी टोपी व दुपटा घालुन स्वाग त करण्यात आले. मध्यतंरी ग्रामोन्नती प्रतिष्ठान व शेत करी कष्टकरी महासंघ आणि विवेकानंद सेवा मंडळ ट्रस्ट कन्हान जि.नागपुर (महाराष्ट्र) या सेवाभावी संस्थे चे ” शिवरत्न ” लोकोपयोगी कार्यालयाचे उद्घाटन मा. देशमुख गुरूजी , मा. पोतदार सर, मा. खर्चे सर, मा. बेहुणे महाराज यांच्या हस्ते विधीवत पुजन करून कर ण्यात आले.

याप्रसंगी नँचरोपेथी डॉ. विजेता, डॉ वराडे पाटील, प्रभाकर हुड, डॉ गिरडकर, कुमार नायर, विनय यादव, रमेश गणोरकर, रेखा टोहणे, कन्हान हाकस युनियनचे प्रशांत पाटिल,चिराल वैध, दिगांबर हारगुडे, प्रकाश सिंह परमसिंह, सचिन चकोले, शेख हबीब, बंटी हेटे, अमोल मोहबे, सरोज बुंदेलिया, इंदिरा वालदे, अनिता वाघमारे, वनिता बुंदे लिया, अनिल हटीले, सुनिल खरवार, सुभाषचंद्र अहिरवार, पंजाब वानखेड़े, राहुल वानखेड़े उपस्थित होते. गुरूदेव सेवा भजन मंड ळाच्या राष्ट्रगिता नंतर स्नेहभोजनाचा सर्व उपस्थितांनी मनसोक्त लाभ घेतला. जन्मोत्सव सोहळयाच्या यश स्वितेकरिता दिलीप राईकवार, मोतीराम रहाटे, कमल सिंह यादव, सचिन साळवी, रविंद्र चकोले, कमलेश पांजरे, विजय डोणेकर, गोविंद जुनघरे, रूपेश सातपुते , हबीब शेख, पुरूषोत्तम येणेकर, संतोष गिरी, जिवन ठवकर, राजु गणोरकर, मनोज गडधे, दिलीप येलमुले, उमराव पाटील, प्रमोद वानखेडे, शंकर राऊत, प्रतिक जाधव, सुधाकर जुनघरे, देवा चतुर, राहुल सोनबरसे, अशोक मेश्राम, यशवंत खंगारे, प्रशांत येलकर, शिव जाधव, आकाश पंडितकर, केतन भिवगडे, निशांत जाधव, शेख हबीब, धर्मराज आपुरकर, आशिष नागपुरे, राहुल ऊके, राजकुमार बावने, आयुष भोगे,क्रिष्णा केझरकर, चेतन ठवरे आदीनी सहकार्य केले. कार्यक्रमास शिवसेना (उबाठा), ग्रामौन्नती प्रतिष्ठाण, शेतकरी कष्टकरी महासंघ व विवेकानंद सेवा मंडळ ट्रस्ट चे पदाधिकारी आणि महिला, पुरूष सदस्य मोठया संख्येने उपस्थित होते.

शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: या पोर्टल वरील बातम्या,लेख,फोटो,विडियो कॉपी करू नये.