महत्वाचेशिक्षण

प्रजासत्ताक दिन, केवळ हक्कांची नाही तर कर्तव्याची आठवण करून देणारा दिवस! प्राचार्य डॉ.नाथा. मोकाटे 

संपादक/ अग्रदूत -श्री गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, शरदचंद्र पवार कला व वाणिज्य महाविद्यालय, आळंदी थील शिक्षणमहर्षी स्व. विलासराव तांबे शैक्षणिक संकुलात ७६ वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला.

Oplus_131072

या प्रसंगी मा.श्री. विठ्ठल कोंडीबा तळेकर मा. सरपंच डुडुळगाव, श्री. योगेश बबन तळेकर- युवा सामाजिक कार्यकर्ते, ह. भ.प. प्रदीप रोडे सदस्य- शाळा व्यवस्थापन समिती, श्री बाळासाहेब तळेकर – सामाजिक कार्यकर्ते इत्यादी ग्रामस्थ तसेच डॉ. प्रमोद इंगळे प्राचार्य – ज्ञानविलास कॉलेज ऑफ फार्मसी, सौ. शितल पाटील प्राचार्या – आदित्य इंटरनॅशनल स्कूल इत्यादी शैक्षणिक संकुलातील विविध शाखेतील पदाधिकारी यांची विशेष उपस्थिती होती.

Oplus_131072

यावेळी राष्ट्रध्वज पूजन ह.भ.प. मोहन महाराज शिंदे यांच्या हस्ते झाले तर ध्वजारोहण . ज्ञानेश्वर वरुटे यांच्या हस्ते झाले.

भारतीय राज्यघटनेच्या उद्देश पत्रिकेचे वाचन व तंबाखू तसेच तंबाखूजन्य पदार्थ खाण्यास बंदी म्हणून सार्वजनिक शपथ घेण्यात आली.शरदचंद्र पवार कला व वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ नाथा मोकाटे यांनी आपल्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने शुभेच्छा देतांना म्हणाले की, प्रत्येकाने देशाचं नाव जगाच्या पाठीवर नेण्यासाठी प्रयत्न व परिश्रम केले पाहिजे.असे प्राचार्य डॉ नाथा मोकाटे यांनी म्हणाले.

Oplus_131072

या प्रसंगी राजा शिवछत्रपती विद्यालय आणि आदित्य इंटरनॅशनल स्कूलमधील विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत, कवायत, संचालन तसेच गौरी कांबळे, आर्णव मुल्ला व प्रताप पतंगे यांनी मनोगते व्यक्त केली.

या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी श्री गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष- मा. श्री. विशाल विलासराव तांबे, सचिव- वैभव विलासराव तांबे, खजिनदार मा. श्री. मयूर मुरलीधर ढमाले व प्रा. डॉ. राजीव पाटील – प्रशासकीय संचालक यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले.

या स्वातंत्र्य दिनानिमित्त शरदचंद्र पवार कला आणि वाणिज्य महाविद्यालय, ज्ञानविलास कॉलेज ऑफ फार्मसी, रामचंद्र पाटील औटी ज्युनियर कॉलेज, राजा शिवछत्रपती विद्यालय व आदित्य इंटरनॅशनल स्कूल, विविध शाखेतील विभाग प्रमुख, सहाय्यक प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.

या प्रजासत्ताक दिन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री सर्जेराव बरकडे यांनी केले तर उपस्थितांचे आभार श्री. अतुल पानसरे मुख्याध्यापक – राजा शिवछत्रपती विद्यालय यांनी मानले.

शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: या पोर्टल वरील बातम्या,लेख,फोटो,विडियो कॉपी करू नये.