Parbhani : एटीएमची अदला बदल करत काढली रक्कम; फसवणुक केल्या प्रकरणी अज्ञातावर गुन्हा दाखल..!

परभणी :- हात चालाखीने एटीएम कार्डची अदला बदल करत खात्यातून ५० हजार रुपये काढुन फसवणूक करण्यात आली. हा प्रकार परभणी शहरातील जिंतूर रोडवरील एटीएममध्ये घडला. या प्रकरणी नानलपेठ पोलीस ठाण्यात अज्ञात इसमावर फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हात चालाखीने एटीएम कार्डची केली आदला बदल
किशोर लक्ष्मणराव कदम यांनी तक्रार दिली आहे. फिर्यादी हे जिंतूर रोडवरील दगडी चाळ येथे असलेल्या एटीएमवर पैसे काढण्यासाठी गेले होते. त्यांच्या पाठीमागे उभे असलेल्या अज्ञात इसमाने फिर्यादीला तुमचे पैसे निघत नाहीत, तुम्ही बाजुला व्हा मी माझे एटीएम कार्ड टाकुन पैसे निघतात का ते पाहते असे म्हणत फिर्यादीला बाजु केले. यावेळी त्यांनी हात चालाखीने एटीएम कार्डची आदला बदल केली. त्यानंतर आरोपीने फिर्यादीचे एटीएम कार्ड वापरुन ५० हजार रुपये काढुन घेत अपहार केला. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर फिर्यादीने नानलपेठ पोलीस ठाणे गाठत तक्रार दाखल केली.तपास पोह सोडगीर करत आहेत.