क्राइम

Raksha Khadse Daughter: रक्षा खडसेंच्या मुलीची छेड काढणारा आरोपी अट्टल गुन्हेगार, आधी पण केलेत मोठे राडे

मुबई : केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीसह काही मुलींची मुक्ताईनगर येथील यात्रेमध्ये टवाळखोरांनी छेडछाड केल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आल्याने जिल्हाभरात एकच खळबळ उडाली आहे.

यानंतर तीनच दिवसांत या दरोड्याचा तपास लावून सात आरोपींना जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे. तसेच आरोपीकडून 17 लाख 45 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

दि. 26 फेब्रुवारी रोजी रात्रीच्या सुमारास फिर्यादी प्रतीक्षा शंकर रोकडे (रा.साकत फाटा,जामखेड, जि.अहिल्यानगर) या त्यांचे कुटुंबीयासह घरी असताना एका महिलेने “दिदी दरवाजा खोलो” असा आवाज दिला. घराचा दरवाजा उघडला, त्यावेळी 7 ते 8 आरोपी हे तोंडाला रूमाल बांधून चाकूसारखे हत्यार घेऊन फिर्यादी, तिची बहीण व आई यांचे अंगावरील सोन्याचे दागिने व घरातील 8 तोळे सोने व 71 हजार रुपये रोख, असा एकूण 3 लाख 22 हजार 750 रुपयांचा ऐवज दरोडेखोरांनी लंपास केला होता. याबाबत जामखेड पोलीस स्टेशनला दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी उपनिरीक्षक तुषार धाकराव यांच्या नेतृत्वाखालील पथक नेमून गुन्ह्यातील आरोपींची माहिती व शोध घेणेबाबत सूचना व मार्गदर्शन करून पथकास रवाना केले. पथकास माहिती मिळाली की, सदरचा गुन्हा बाबा आबा काळे (रा.लक्ष्मीपेढी, तेरखेडा, ता.वाशी,जि.धाराशिव) याने त्याचे साथीदारासह केला असून ते गुन्हा करण्याकरीता पुन्हा स्कार्पिओ गाडीने जामखेड येथे येणार आहेत. तपास पथकाने जामखेड येथे सापळा लावला. स्कॉर्पिओ गाडी खर्डाकडून जामखेडच्या दिशेने येत असल्याने संशयित वाहनांना थांबविले. त्यावेळी स्कॉर्पिओ गाडीमधील इसम गाडीचा दरवाजा उघडून पळू लागले. पथकातील अंमलदारांनी पळून जाणाऱ्या इसमांचा पाठलाग करून तीन जणांना पकडले असून, दोन जण पळून गेले.

गाडीमधील अनिल मच्छिंद्र पवार (वय 32), सुनिल धनाजी पवार (वय 19), संतोष शिवाजी पवार (वय 22, सर्व रा. लक्ष्मीपेढी, तेरखेडा, ता.वाशी, जि.धाराशिव), रमेश मत्या काळे (वय 47, रा.म्हसा खांडेश्वरी, ता.कळंब, जि.धाराशीव) व स्कॉर्पिओ गाडीमधील बाबा आबा काळे (वय 25), अमोल सर्जेराव काळे (वय 23 रा.लक्ष्मीपेढी, तेरखेडा, ता.वाशी जि.धाराशीव), शिव अप्पा पवार (वय 24, रा.बावी, ता.वाशी, जि.धाराशीव) असे असल्याचे सांगितले. त्यांचेकडे पळून गेलेल्या इसमांचे नाव विचारले असता त्यांनी कुक्या बादल काळे (रा.मोहा, ता.कळंब, जि.धाराशीव), सचिन काळे (पूर्ण नाव माहित नाही रा. जामखेड) असे असल्याचे सांगीतले. आरोपी काळे याने वरील आरोपी व महिला शालन अनिल पवार, (रा.तेरखेडा, ता.वाशी, जि.धाराशीव) अशांनी मिळून वाहनांमधून 3 ते 4 दिवसांपूर्वी जामखेड ये.िथे सचिन काळे याचे सांगणेवरून त्याने दाखविलेल्या एका घराचा दरवाजा वाजविला. शालन पवार हिने दिदी दरवाजा खोलो असे बोलून दरवाजा उघडल्यानंतर चाकूचा धाक दाखवून सोन्याचे दागिने, रोख रक्कम व मोबाईल चोरल्याचे सांगितले.

आरोपीकडून इरटिगा गाडी, स्कॉर्पिओ गाडी, 4 मोबाईल असा एकूण 13 लाख 45 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. गुन्ह्यातील काही दागिने शालन अनिल पवार व अनिल मच्छिंद्र पवार यांनी विकले. काही दागिने हे कुक्या बादल काळे व सचिन काळे यांचेकडे आहेत. आरोपी अनिल मच्छिंद्र पवार याने त्याचेकडील दागिने हे (तेरखेडा, ता. वाशी, जि. धाराशीव) येथील सोनारास विकल्याची माहिती सांगितल्याने सोनाराकडून 4 लाख किंमतीची सोन्याची लगड जप्त करण्यात आलेली आहे. ताब्यातील आरोपीस गुन्ह्याचे तपासकामी जामखेड पोलीस स्टेशन येथे मुद्देमालासह हजर करण्यात आले. गुन्हयाचा पुढील तपास जामखेडच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक वर्षा जाधव करीत आहेत.

शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: या पोर्टल वरील बातम्या,लेख,फोटो,विडियो कॉपी करू नये.