ताज्या घडामोडीमहत्वाचे

Omprakash Deora Bank: अर्बन बँकेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष संचालक, मुख्य कार्यकारी अधिकारी व वरीष्ठ अधिकारी यांचे एक दिवशीय प्रशिक्षण शिबीर संपन्न

बँकेचे ओमभवन व स्व. ओमप्रकाशजी देवडा यांच्या १० पुण्यतिथी निमित्त

हिंगोली  : ओमप्रकाशजी देवडा यांच्या १० पुण्यतिनिथी निमित्त ३ मार्च रोजी बँकेचे नवीन मुख्य कार्यालय ओमभवन येथे बँकेचे अर्बन बँकेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष संचालक, मुख्य कार्यकारी अदिकारी व वरीष्ठ अधिकारी यांचे एक दिवशीय प्रशिक्षण शिबीर बंकेचे मुख्य कार्यालय नवीन इमारत ओमभवन येथे घेण्यात आले होते. हिंगोली येथील विविध अर्बन व  नागरी सहकारी बँकांच्या पदाधिकारी आपली उपस्थिती नोंदवली.

एक दिवशीय प्रशिक्षण शिबीराच्या पहिल्या सत्रात बँकींग तज्ञ वक्ते डॉ. अभय मंडलिक यांनी संचालकांनी बैंक चालवतांना घ्यावयाची दक्षता, एन.पी.ए. मॅनेजमेन्ट, सी. आर. ए. आर, डोआयसीजीसी, के. वाय.सी., गुंतवणुक, कर्ज देतांना घ्यावयाची काळजी, ऑडीट, रिझर्व्ह बँकेचे दंड आदी विषयावर सखोल मार्गदर्शन केले व उपस्थितांच्या प्रश्नाचे निरासण सुद्धा केले.

दुस-या सत्रात ओमप्रकाश देवडा पीपल्स को-ऑप. बँकेचे  माजी मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप वेल्हाणकर यांनी कर्ज फाईल तपासणी  व नवनवीन क्षेत्रात कर्ज वाटप, बँके समोरील आव्हाने आणि  या विषयावर आपले मार्गदर्शन केले.

सदरील एक दिवशीय प्रशिक्षण शिबीर हे हिंगोली परभणी  अर्बन को ऑप. बैंक असोसिएशन तथा सहकार भारती हिंगोली द्वारा आयोजित केले होते. मुख्य सहयोगी म्हणून ओमप्रकाश देवडा पीपल्स को-ऑप. बँक लि. हिंगोली हे होते. ओमप्रकाश देवडा पीपल्स को-ऑप. बँकेच्या ओमभवन येथे प्रशिक्षणासाठी प्रशस्त असा सभागृह निर्माण करण्यात आले आहे.

यावेळी बँकेचे अध्यक्ष प्रकाशचंद सोनी व उपाध्यक्ष सुनिल देवडा व मा. संचालक मंडळांनी मराठवाड्यातील सर्व नागरी व अर्बन बँकेच्या प्रशिक्षण शिबीरासाठी हा हॉल निशुल्क उपलब्ध करुन देण्यात येईल असे सांगितले. याप्रसंगी  बँकेचे अध्यक्ष प्रकाशचंद सोनी यांनी आपले विचार मांडले, बँकेचे उपाध्यक्ष यांनी सहकारी नागरी अर्बन बँकांना येणा-या अडचणी वर आपले विचार मांडले व भविष्यात सर्व नागरी सहकारी बँकांना जवळ कसे येता येईल असे मार्गदर्शन केले.

यावेळी  सहकार भारतीचे डॉ. किशोर मंत्री, जनकराज खुराणा, बँकेचे संचालक विठ्ठलदासजी मुंदडा, शशिकांत दोडल,  ज्ञानेश्वर मामडे, गजाननराव देशमुख,  राजेश अग्रवाल, आशिष काबरा, राजु मुदिराज, अजित बज, संजय देवडा,  एम.एम. बुद्रुक, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी  सुधीर जालनापुरे, सरव्यवस्थापक  शशिकांत कंदी, उप सरव्यवस्थापक  सुधीर मुळे, सहा. सरव्यवस्थापक  श्रीराम माळोदे,  ज्ञानदेव घुगे, संजय घोडेकर व कर्मचारी वृंद उपस्थित होते.

FacebookWhatsappInstagramTelegram
शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: या पोर्टल वरील बातम्या,लेख,फोटो,विडियो कॉपी करू नये.