पावडरने पिकविलेल्या आंब्याचा रस जावईबापूंना चालणार का?

परतवाडा गावरान आंबा बाजारात येण्यासाठी वेळ आहे. तत्पूर्वी, संकरित आंबा बाजारात येण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. यावर्षी हा आंबा वेळेपूर्वीच दाखल झाला आहे. यातील अनेक आंब्यांवर रासायनिक पद्धतीने फळ पिकविण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. अशा पद्धतीने कृत्रिमरीत्या पिकविलेला आंबा आरोग्यासाठी घातक आहे.
आंबा कृत्रिम पद्धतीने पिकविल्यानंतर आरोग्यविषयक अनेक अडचणी निर्माण होतात. यामुळे कृत्रिमरीत्या पिकविला गेलेला आंबा आरोग्यासाठी घातक ठरत आहे. यावर मात करण्यासाठी नागरिकांनीच सावध होण्याची आवश्यकता आहे. नैसर्गिकरीत्या पिकविला गेलेला आंबा आरोग्यवर्धक मानला जातो. मात्र, त्याची ओळख करायची कशी, असा प्रश्न नागरिकांपुढे आहे.
बाजारात आवक कमी उन्हाळ्याचे दिवस सुरु झाले असले तरी रसाळफळांची आवक असली तरी आंब्याची चव चाखण्यासाठी शहरातील फळ बाजारात देवगड हाफुस व अन्य आंब्याची आवक सुरु झालेली नाही. आंब्याच्या रसासाठी प्रतीक्षा करावी लागेल.
२०० रुपये किलोने मिळतो आंबा बाजारात दाखल आंध्र प्रदेश येथील आंबा बदाम, लालबाग यावर्षी पहिल्याच आठवड्यात २०० रुपये किलो दराने विक्री होत आहे. हा आंबा खरेदीसाठी मोजकेच ग्राहक आहे
शहरात हैदराबाद, देवगड आंबा शहरात विविध भागातून आंबा येतो. यामध्ये देवगड, हैदराबाद, रायचोटी, विजयवाडा येथून हापूस, लालबाग, बैगनपल्ली (बदाम) अशा विविध जातींचे आंबे बाजारात आले आहेत.
हंगामाच्या सुरुवातीला मिळतो अधिक पैसा हंगामाच्या प्रारंभी आंब्याला जास्त दर मिळतो. त्यानुसार आंब्याचे अधिक पैसे मिळावेत, यासाठी त्यावर तशा फवारण्या केल्या जातात. यामुळे झाडांना फळधारणा लवकर होते. तसे पोषक वातावरण असणे आवश्यक आहे.
कार्बाईडवर बंदी, इथेलिनला परवानगी आंबा पिकविण्यासाठी कार्बाईड रसायनावर बंदी घालण्यात आली आहे, तर इथेलिन नावाच्या पावडरचा वापर करण्यास परवानगी आहे. याशिवाय अॅसेटिलिन नावाचा गॅस आंबा पिकविण्यासाठी वापरला जातो. याला कायदेशीर परवानगी आहे. मात्र, त्यासाठी काही लिमिट दिली आहे.
अन्न व औषध प्रशासनाची नजर आंबा कुठल्या पद्धतीने पिकविला जातो, यासंदर्भात तपासणी केली जात आहे. हानिकारक केमिकल वापरून आंबा पिकविला जातो काय, याबाबतची तपासणी करण्यासाठी अन्न व औषधी प्रशासनाने यंत्रणा सज्ज केली आहे.
रासायनिक आंबे कसे ओळखणार?१ रासायनिक आंबा पूर्णतः पिवळा होतो. त्याला अधिक चमक असते. तो सर्वाधिक आकर्षक दिसतो. त्या तुलनेत नैसर्गिकरीत्या पिकविलेला आंबा डल असतो. देठ आणि खालील बाजूला हा आंबा नरम असतो.
२ असा आंबा नैसर्गिक पिकविलेला आंबा म्हणून ओळखता येतो. रासायनिक आंबा वरून पिवळा आणि आतून काळाही पडतो.
सध्या दाखल झालेला आंबा हा देवगडमधून आलेला आंबा आहे. यावर्षी मोठ्या प्रमाणात आंबा बाजारात येण्याची शक्यता आहे. आंब्याचे दर कमी होतील.
शेख अलीम शेख चांद, व्यापारी अन्न व औषध प्रशासनाने आंब्याला पिकविण्यासाठी शास्त्रशुद्ध पद्धतीचा अवलंब करण्याचे आवाहन केले आहे. तरी शहरात येणाऱ्या आंब्यावर अन्न व औषध प्रशासनाची नजर आहे
गजानन गोरे, निरीक्षक, अन्न व औषध प्रशास अधिकारी, अमरावती