ताज्या घडामोडीदेश विदेशमहत्वाचेमहाराष्ट्र

दर्यापुरातील तीन ग्रामपंचायती टीबीमुक्त

दर्यापूर तालुक्यातील रामगाव, तोंगलाबाद व कळमगव्हाण या तीन टीबीमुक्त ग्रामपंचायती रौप्य पुरस्काराकरिता पात्र ठरल्यामुळे महात्मा गांधी यांची रौप्य प्रतिमा व प्रमाणपत्र देऊन सन्मानित केले.

अमरावती येथे नियोजन भवनात टीबीमुक्त ग्रामपंचायत उपक्रम “रौप्य महोत्सव” गौरव सोहळा २०२४ घेण्यात आला. कार्यक्रमाला पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, खा. बळवंत वानखडे, आ. गजानन लवटे, सीईओ संजिता महापात्र,डीएचओ डॉ. आसोले, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. रमेश बनसोड याप्रसंगी उपस्थित होते. दर्यापूर तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सचिन गोळे, डॉ. स्वाती जामनिक, डॉ. चव्हाण, डॉ. गोळे, अमोल गुल्हाने, सुनील टाक, नितीन उबरहंडे, डॉ. अफ्रोज खान, डॉ. जयश्री डालके तसेच रामगाव, कळमगव्हाण व तोंगलाबाद येथील सरपंच व ग्रामसेवक हजर होते.

चिखलदऱ्यातील कोरडा क्षयरोगमुक्त चिखलदरा : तालुक्यातील कोरडा ग्रामपंचायत टीबीमुक्त असल्याने जिल्ह्याच्या इतर ग्रामपंचायतींसह कोरडा येथील सरपंच सोनाजी सावलकर यांना पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आ. केवलराम काळे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. सचिव मरसकोल्हे, डॉ. आशिष अलोकार आदी उपस्थित होते. या यशासाठी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष सहदेव बेलकर, नवीन राठोड, पीयूष मालवीय यांच्यासह सदस्य, उपसरपंच, गावकऱ्यांनी सहकार्य केले.

शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: या पोर्टल वरील बातम्या,लेख,फोटो,विडियो कॉपी करू नये.