ताज्या घडामोडीमहत्वाचेमहाराष्ट्र
बडनेरा ते नाशिक मेमू ट्रेनच्या वेळेत बदल

बडनेरा : बडनेरा ते नाशिक मेमू ट्रेनच्या वेळेत बदल झाला आहे. ही गाडी सकाळी १० वाजून ५ मिनिटांनी बडनेरा रेल्वे स्थानकावरून सुटणार आहे. १ एप्रिल २०२५ पासून हा बदल केला आहे. आधी ही गाडी ११ वाजून ५ मिनिटांनी सुटत होती. नव्या टाईमटेबलनुसार नाशिक रोड येथे सायंकाळी ७ वाजून ५ मिनिटांनी ही गाडी पोहोचणार आहे. प्रवाशांची गैरसोय होऊ नये, यासाठी रेल्वे प्रशासनाने एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. या मेमू ट्रेनला प्रवाशांची गर्दी असते. शेगावला जाणाऱ्यांसाठी ही गाडी सोयीची आहे. नाशिक रोड रेल्वे स्थानकावरून ही गाडी पूर्वीच्याच वेळेमध्ये सुटणार आहे. प्रवासी संघटनांनी या गाडीच्या वेळेमध्ये बदल करण्याची मागणी केलेली होती.