ताज्या घडामोडीदेश विदेशमहत्वाचेमहाराष्ट्र

चोरी पकडून दिली म्हणून टोळक्याकडून चाकूने हल्ला

वारंवार होत आहेत घटना : अचलपूर शहराची संघटित गुन्हेगारीकडे वाटचाल ?

 

याप्रकरणी, अचलपूर पोलिसांनी प्राणघातक हल्ला व खून करण्याचा प्रयत्न अशा कलमांन्वये गुन्हा दाखल केला. या घटनेने खळबळ उडाली होती.

 

अचलपूर : चोरी पकडून दिली, म्हणून टोळक्याने वचपा काढण्यासाठी चाकूहल्ला केला. त्यामध्ये एक अल्पवयीन गंभीर जखमी झाला. स्थानिक बाजार समिती चौकात ही घटना २७ मार्च रोजी रात्री ८ च्या सुमारास घडली.

सर्वेश प्रमोद बोडखे (१७, रा. नरसाळा) असे जखमी युवकाचे नाव आहे. याप्रकरणी अकरावीत शिकत असलेल्या सम्यक सोहम मेश्राम (१६, रा. धोतरखेडा, ता. अचलपूर) याने अचलपूर पोलिस ठाण्यात नोंदविलेल्या फिर्यादीनुसार, त्याच्या निवासस्थाना पुढील बंद डाळ मिलमध्ये चार मुले शिरल्याची माहिती परिसरातील रवी गायकवाड याने गौरव जैन व महावीर जैन या मिलमालकांना दिली. ते घटनास्थळी आल्यानंतर सम्यक हादेखील त्यांच्यासोबत आत गेला, चोरी करणाऱ्या मुलांपैकी १६ वर्षीय अल्पवयीन (रा. परतवाडा) याच्यासह अन्य एकाला आत, तर मिलच्या बाहेर आणखी एकाला पकडण्यात आले. त्यांनी २६ मार्च रोजी दोन ड्रम व एक टीन चोरला, तर स्टार्टर चोरून नेत होते. मिलमालक गौरव जैन यांनी त्या तिघांच्या आई-वडिलांना बोलावून त्यांच्याकडे त्यांना सोपविले.

 

२७ मार्च रोजी सकाळी ८ च्या सुमारास सम्यकला भुरा नामक एकाने कॉल केला आणि बाजार समिती परिसरात भेटण्यास बोलावले. संशय आल्याने तो बंधू पीयूष लक्ष्मीनारायण मेश्राम, मित्र सर्वेश व धवल गुजर (१६, रा. ब्राह्मण सभा, परतवाडा) यांच्यासमवेत दोन दुचाकीने गेला. त्यावेळी तीन दुचाकींवर चोरी प्रकरणातील अल्पवयीनासह अभिषेक रायबोले (१८, रा. फॉरेस्ट कॉलनी), अभिजीत शेवता (१९), अंश रवींद्र पाचपाळ (१९, दोघेही रा. रविनगर, परतवाडा) व एक अल्पवयीन असे पाच जण तेथे होते. त्यांनी सम्यकला दगड व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. सर्वेश वाचविण्याचा प्रयत्न करीत असतानाच त्याला कॉल आला. तो रिसिव्ह करीत असतानाच अभिजीत शेवता याने पाठीवर चाकूने वार केला.

शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: या पोर्टल वरील बातम्या,लेख,फोटो,विडियो कॉपी करू नये.