ताज्या घडामोडीदेश विदेशमहत्वाचेमहाराष्ट्र
तिवस्याच्या नगराध्यक्षपदी प्रतिभा गौरखेडे बिनविरोध

तिवसा : स्थानिक नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदासाठी शुक्रवारी निवडणूक पार पडली. यावेळी प्रतिभा गौरखेडे यांची अविरोध निवड करण्यात आली.
उपजिल्हाधिकारी ज्ञानेश्वर घ्यार पीठासन अधिकारी होते. त्यांना शिवदास मुसळे यांनी साहाय्य केले. सकाळी ११ वाजता १९ सदस्यांच्या उपस्थितीत निवडणूक प्रक्रिया पार पडली. यावेळी तहसीलदार डॉ. मयूर कळसे, नायब तहसीलदार आशिष नागरे उपस्थित होते. प्रतिभा वानखडे यांना उपाध्यक्ष प्रिया विघ्ने यांनी पदभार सोपविला. माजी मंत्री यशोमती ठाकूर यांच्या नेतृत्वात डॉ. राजीव ठाकूर, मुकुंद देशमुख, सेतू देशमुख, दिलीप काळबांडे, वैभव वानखडे, योगेश वानखडे, प्रणव गौरखेडे, दिवाकर भुरभुरे, प्रमोद वानखडे, पिंटू राऊत, अनिकेत देशमुख, नितीन मेहकरे उपस्थित होते.